अमरावती शहरालगत जाणाऱ्या-नागपूर एक्सप्रेस हायवेवर हॉटेल गौरी इन जवळ भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट ठार झाल्याची घटना आज पहाटे घडली आहे. सदर घटनेची माहिती मिळतात वनविभागाच्या टीम धाव घेतली असून घटनेचा पंचनामा केला आहे
या आधीही या महामार्गावर अशीच एक घडली होती, तर शहराला लागून असलेल्या महामार्गावर अनेकदा जंगली जनावरे वाहनांच्या आडवे येतात त्यामुळे अनेकदा अपघात होतात. महादेव खोरी, वडाळी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसर यासह अर्जुन नगर परिसरात बिबटचे वास्तव्य वाढले आहे.
अर्जुन नगर परिसरातून हॉटेल गौरी यांच्या मागे असलेल्या श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या परिसरातून हा बिबट पहाटे अचानक धूतगती महामार्गावर आला आणि त्याचवेळी महामार्गावरून जाणाऱ्या भरदावेकात असणाऱ्या वाहनाची धडक ह्या बिबटला लागली आणि हा बिबट जागीच ठार झाला.
शहरात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या बिबट च्या वास्तव्यामुळे अनेक भागात नागरिक भयग्रस्त झाले असून नागरिकांच्या मनातील भीती दूर व्हावी यासह बिबटचे प्राण वाचावे यासाठी वनविभागाच्या वतीने नागरी परिसरात फिरणाऱ्या बिबट्यांना जंगलात सुरक्षित ठिकाणी हलवावे अशी मागणी होत आहे..