Friday, November 22, 2024
Homeगुन्हेगारीअमरावती | जबरीचोरीच्या प्रकरणातील फिर्यादीच निघाला आरोपी...

अमरावती | जबरीचोरीच्या प्रकरणातील फिर्यादीच निघाला आरोपी…

अमरावती पोलिसांनी एका जबरी चोरी प्रकरणात मोठा खुलासा केला आहे. दिनांक १२/१०/२०२२ रोजी तक्रारदार मो. आसिफ मो. साबीर वय ३२ रा. शनवरा, ब-हाणपुर (म.प्र.) हे जवाहरलाल ॲन्ड सन्स ब-हाणपुर येथून प्लायवुड घेवुन धारणी येथे व्यापारी कडे त्यांच्या टाटा एस ई या चारचाकी वाहनाने पोहोचवुन व्यापा-या कडुन २,००,००० /- घेवुन परत ब-हाणपुर कडे जात असतांना ग्राम कळमखार नजीक अज्ञात ०३ इसमांनी मोटार सायकलने येवुन त्यांना अडवुन त्यांचे जवळील नगदी २,००,०००/- व मोबाईल किं. ५,०००/- असा एकुण २,०५,०००/- चा माल तक्रारदार यास मारहाण करून जबरीने हीसाकावुन नेला अशी तक्रार दिली.

वरून पो.स्टे. धारणी येथे अप.क्रं. ५३१ / २२ कलम ३९२, ३२३,३४ भा. दं.वी प्रमाणे नोंद करून तपासात घेण्यात आला. गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेता श्री. अविनाश बारगळ, पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामिण तसेच श्री. शशिकांत सातव, अपर पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रामिण यांनी सदर गुन्हयातील अज्ञात आरोपींतचा तात्काळ शोध घेवुन गुन्हा उघडकिस आणण्या बाबत पोलीस अधीकारी व अमंलदार यांना मार्गदर्शन करून सुचना निगमीत केल्या होत्या.

सदर गुन्हयाचा तपास पो.स्टे. धारणी व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करित असतांना सदर तक्रारदारास विचारपुस केली असता त्याचे घडलेल्या घटनेचे बतावणीवर संशय आल्याने त्यास विश्वासात घेवुन अधिक विचारपुस केली असता तसेच तांत्रीक विश्लेषणावरून सदर गुन्हा त्याने त्याला ब-हाणपुर येथे प्लॉट घ्यावयाचा न्हें परिष असल्याने पेश्यांची आवश्यकता होती म्हणुन केला असल्याचे निष्पन्न झाले.

सदरची कार्यवाही श्री नायडु, उपविभागीय पोलीस अधिकारी, धारणी यांचे मार्गदर्शनात श्री. तपन कोल्हे, पो.नि., स्थानिक गुन्हे शांखा, श्री.सुरेन्द्र बेलखेडे, ठाणेदार पो.स्टे. धारणी यांचे नेतृत्वात स.पो.नी. श्री. रामेश्वर धोंडगे,पो.उप.नि.सुयोग जे वाला महापुरे, पोलीस अंमलदार दिपक उईके, मंगेश लकडे, स्वप्नील तंवर, युवराज मानमोठे, राम सोळंके,जगत तेलगोटे,योगेश राखोंडे,चालक संदीप नेहारे यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस स्टेशन धारणी करीत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: