नरखेड – अतुल धंदरे
मनोज कोरडे जिल्हा महामंत्री भाजपा नगरविकास आघाडी यांचे नेतृत्वात भाजपने पुकारलेल्या दहा दिवसी य साखळी उपोषणातून नरखेड येथे छत्तीसगड, गोंडवाना, जबलपूर, दानापूर एक्सप्रेस या ४ गाड्यांचे अखेर थांबे मिळाले. त्या अनुषंगाने नरखेड येथे १४ ऑक्टोबर रोजी पहाटे ६.३० वाजता गोंडवाना एक्स्प्रेसचे आगमन झाले. लोको पायलटचे स्वागत मनोज कोरडे यांनी तर गाडीला शामराव बारई जिल्हा महामंत्री सहकार आघाडी यांनी हिरवी झेंडी दाखवून पुढील प्रवासा करीता रवाना केली.
रेल्वेमंत्री यांना भेटण्यास गेलेले शिष्टमंडळ सर्वश्री चरणसिंगजी ठाकूर, किशोर रेवतकर, उकेश चौहान,मनिष दुर्गे,सुरेश शेंद्रे, रुपेश बारई यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.याप्रसंगी सुनील कोरडे,मदन कामडे, प्रमोद वघाळे, संजय कामडे, प्रमोद वैद्य,अशोक कळंबे, राजेश क्षीरसागर,किशोरी कहाते,गीता अंतूरकर,
धनराज खोडे,मो. शफी सिद्दीकी, विठ्ठलराव बालपांडे, स्वप्नील नागपुरे, अजाबराव वंजारी, दीपक बेहरे, संदीप मेतकर, कैलाश रेवतकर, शरद मदनकर, विजय दातीर, अनिल भुजाडे, अतुल घोगरे, पंकज वैद्य, लीलाधर काळे, नामदेव बारई, अर्चना डहाणकर, लीला भालेकर, सारिका डहाणकर आदी भाजपचे शेकडो कार्यकर्ते आणि प्रवासी उपस्थित होते
तसेच आज नरखेड ला गांधी चौकात जाहीर सभा आयोजीत केलेली असुन नरखेड येथील रेल्वे आंदोलन यशस्वी झाल्या बद्दल साखळी उपोषणाची समाप्ती करण्याकरिता साय 6 वाजता भाजपचे नागपूर जिल्हा अध्यक्ष अरविंदजी गजभिये,भाजप प्रदेश सदस्य डॉ राजीवजी पोतदार, जिल्हा उपाध्यक्ष व काटोल,नरखेड विधानसभा नेते चरनसिंगजी ठाकूर,
संघटन महामंत्री किशोरजी रेवतकर जी प माजी शिक्षण सभापती उकेशबाबु चौहान येणार आहेत, त्यानंतर गांधी चौकात जाहीर सभेला मार्गदर्शन करतील, जनतेनी मोठ्या संख्येनी उपस्थित राहावे ही विनंती! मनिष दुर्गे महामंत्री,भाजपा नरखेड यांनी केली आहे.