सांगली प्रतिनिधी:– ज्योती मोरे.
कवठेमंकाळ पोलिसांनी खरशिंग ते दंडोबा कडे जाणाऱ्या रोड लगत गिरणार तपोवनच्या परिसरात अंदाजे २० लाखांचे हस्तीदंत विक्रीच्या उद्देशाने बाळगणाऱ्या राहुल भिमराव रायकर वय 26 राहणार, आमे गल्ली, संकपाळ गल्ली कसबा बावडा कोल्हापूर, बालाजी हरिश्चंद्र बनसोडे वय 30 राहणार विजयनगर कोल्हापूर, कासिम समशुद्दीन काझी राहणार ख्वाजावस्ती मिरज, आणि हनुमंत लक्ष्मण वाघमोडे वय 39 राहणार पांडेगाव तालुका अथनी जिल्हा बेळगाव या चौघा आरोपींना छापा टाकून गजाआड करण्यात आले.
त्यांच्यावर कवठेमंकाळ पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण कायदा एकूण 1972 च्या कलम 2, 39, 48 अ, 49, 49 अ,49 ब 50 सह 51 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलाय. सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना चार दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक आमिरशा फकीर करत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक दीक्षित दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गोंडे साहेब, पोलीस फौजदार विजय घोलप, पोलीस नाईक,आमिरशा फकीर, चंद्रसिंग साबळे ,पोलीस शिपाई केरबा चव्हाण,सिद्धेश्वर कुंभार आदींनी केली.