सुरज फाउंडेशन संचलित नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज एमआयडीसी कुपवाड सांगली यांच्यामार्फत कै सुरजमलजी लुंकड यांच्या 39 व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त व निसर्गोपचार तज्ञ सुप्रसिद्ध व्याख्याते श्री स्वागत तोडकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक ट्रस्टी श्री प्रवीण शेठ लुंकड सुरज फौंडेशनच्या संचालिका सौ संगीता पागनीस मराठी माध्यम चे मुख्याध्यापक मा श्री अधिकराव पवार शाळेचे अध्यक्ष श्री यशवंत तोरो उपस्थित होते. तमसो मा ज्योतिर्गमय या युक्तीप्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे यांचे हस्ते कै सुरजमलजी लुंकड यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यानंतर संस्थेचे संस्थापक ट्रस्टी श्री प्रवीण लुंकड यांनी
श्री स्वागत तोडकर यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला संस्थेचे संस्थापक प्रवीण लुंकड आपले प्रास्ताविकात बोलताना म्हणाले की सुरज फाउंडेशन या संस्थेचा क्रीडा सामाजिक व शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रमात सहभाग असतो हा वारसा परंपरागत लाभलेला आहे .पुण्यात नैसर्गिक उपचार केंद्र मुलांसाठी अंध शाळा सुरू केली आहे.व्याख्यानाच्या प्रयोजनाचा हेतू म्हणजे बदलती जीवनशैली मोबाईलचा वाढता वापर.
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ सुप्रसिद्ध व्याख्याते श्री.स्वागत तोडकर मार्गदर्शन करताना म्हणाले की पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे पैसा पोटापुरता झाला म्हणजे तो चांगला पण त्या पैशाचाच चांगल्या कामासाठी किंवा समाजासाठी देणारे लोकांचे प्रमाण खूप कमी असते अशा सामाजिक उपक्रमामध्ये आपल्या सुरज फौंडेशन संस्थेचा सहभाग हा उल्लेखनीय आहे.
रोगाचा समूळ नाश करण्याची ताकद आयुर्वेदासह निसर्गोपचारात आहे. सध्याच्या धावपळीच्या युगात निसर्गातील पाने फुले फळे यांच्यातील नैसर्गिक असणाऱ्या औषधी गुणधर्मांचा वापर करून उत्कृष्ट आरोग्य कसे मिळवता येईल या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले .
सध्या लहान मुलांच्या मध्ये टीव्ही मोबाईल यांचा वापर वाढलेला आहे मुले आळशी बनत चाललेली आहेत मुलांमध्ये व्यायामाचा अभाव आहे त्यामुळे मुलांच्या मध्ये लठ्ठपणा वाढत आहे त्यांच्या या एकूण परिस्थितीला कुठेतरी पालक जबाबदार आहेत असे त्यांनी मत मांडले.
स्त्रियांच्या आरोग्याविषयी बोलताना म्हणाले की स्त्रियांनी आत्मनिर्भर व्हावे त्यांच्यातील आत्मविश्वास त्यांनी वाढवावा स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी समतोल आहार घ्यावा योगा व व्यायामाला महत्त्व द्यावे. कोणत्याही आजाराच्या लक्षणाविना औषधे घेऊ नका शक्य तेवढी आयुर्वेदिक औषधी प्रणाली अवलंबावी असा मौलिक सल्ला त्यांनी दिला.
पुरुषांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन करत असताना म्हणाले की हल्लीच्या तरुणांनी व्यसनाधीन न होता व्यायाम करावा .आत्मविश्वास व धाडसी वृत्ती वाढवावी असे आव्हान केले. ही माणसे कामात व्यस्त असतात ते आजारापासून दूर राहतात तुमचा आत्मविश्वास हीच तुमची प्रतिकारक शक्ती आहे असा मौल्यवान सल्ला त्यांनी दिला.
कोरोनाच्या कालावधीमध्ये आयुर्वेदिक काडे घेऊन बऱ्याच लोकांनी कोरोना वर मात केली त्यामुळे जगाने देखील आयुर्वेदाचे महत्त्व जाणले.भारतीय संस्कृती, संस्कार यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील सहाय्यक शिक्षिका सौ विनिता रावळ व सहाय्यक शिक्षिका सौ सरिता पाटील यांनी केले ,तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे संयोजक नवकृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यमचे मुख्याध्यापक माननीय श्री.अधिकराव पवार यांनी केले
या कार्यक्रमासाठी संस्थेतील इतर पदाधिकारी सौ गीतांजली देशमुख -पाटील, मा. श्री प्रशांत चव्हाण, मा.श्री. संतोष बैरागी, श्री विनायक जोशी, श्रीशैल्य मोटगी, राजेंद्र पाचोरे, असलम संनदि , सुनिल चौगुले सौ.वंदना कुंभार, सौ.अश्विनी माने बजरंग पाटील, बन्सी काका ओस्तवाल, रमेश आरवाडे,अमोल पाटील विविध नामवंत कंपन्यांचे उद्योगपती उपस्थित होते. या व्याख्यानास मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता संस्थेतील सर्व पदाधिकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व परिसरातील अनेक लोकांनी व्याख्यानाचा आस्वाद घेतला व संस्थेने राबवलेल्या उपक्रमाबद्दल सर्वांनी कौतुक केले आभार व्यक्त केले व स्वागत तोडकर यांनी दिलेल्या मौलिक संदेशाचा उपयोग करून जीवन आनंदी करण्याचे व निसर्गोपचार घेऊन जीवन जगण्याचे मान्य केले.