दानापूर – गोपाल विरघट
दानापूर येथे दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर यावर्षी शासनाच्या निर्देशानुसार सर्वत्र शिथिल झाल्यानंतर या वर्षी ईद मिलादुन्नबी जुलूस मस्तान शहा दर्गा मस्जिद मध्ये उत्साहात साजरा करण्यात आला मुस्लिम गुरु मोहम्मद पैगंबर (मोहम्मद संलल्ला व आलयव संलम)यांच्या जयंती निमित्ताने ऐलेसुन्नत वल जमात दानापुर येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने मस्तान शाहा वली मजार येथे गलेब व चादर चढून टिपू सुलतान ग्रुपच्या युवकांनी व मस्तान शहा दर्गाच्या सदस्यांनी गावातील सर्व मुस्लिम बांधवांनी ईद साजरी केली.
यावेळी सर्व मुस्लीम बांधवांना जेवण्याची व्यवस्था यावेळी करण्यात आली होती .यावेळी बशीर शाहा, शेरू शाहा, मोबीन शाहा, शेख तालीब, असलम खान, वाजिद शाहा, अतहर सौदागर, शेख़ मैबुब,राजिक सौदागर ,फिरोज पठान, शेख़ शैवकत, शेख़ सलीम, सरपंच पती धम्मपाल वाकोडे, जिल्हा परिषद माझी उपाध्यक्ष सुभाष रौंदळे ,साहेबराव वाकोडे ,रवींद्र दामदर सर,श्रीकृष्ण विरघट, योगेश येऊल ,कपिल घायल ,नरहरी हागे, नंदकिशोर नागपुरे ,यांनी मस्तान वली दर्गाह मध्ये जाऊन चादर चढून जुलुस मध्ये सहभागी झाले.