Thursday, September 19, 2024
Homeराज्यरामटेक मधील दुर्गम आदिवासी बहुल गावात शेखर भाऊ दुंडे यांच्या उपस्थितीत महाराणी...

रामटेक मधील दुर्गम आदिवासी बहुल गावात शेखर भाऊ दुंडे यांच्या उपस्थितीत महाराणी दुर्गावती जयंती साजरी…

रामटेक – राजू कापसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रामटेक तालुक्याचे  तालुकाध्यक्ष महाराष्ट्र सैनिक शेखर भाऊ दुंडे यांनी रामटेक तालुक्यातील सिंदेवाणी व खिडकी ह्या अतिदुर्गम आदिवासी भागात दिनांक ५ ऑक्टोबर या दिवशी आदिवासींचे दैवत असलेल्या महाराणी दुर्गावती यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. हा दिवस बलिदान दीन म्हणून साजरा केला जातो.

रामटेक पासून अंदाजे २५ किमी अंतरावर असलेल्या अतिदुर्गम आदिवासी बहुल गावात महाराणी दुर्गावती जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सर्व गावकरी महिला भगिनी व बांधव आदिवासी पद्धतीचे खास नृत्य करून जयंती मोठ्या थाटात साजरी करतात. रामटेक लोकसभा तसेच विधानसभा क्षेत्रात सर्व दूर दौरे करून पक्ष संघटन बळकट करणाऱ्या मा. शेखर भाऊ दुंडे यांच्या विशेष उपस्थित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमातील भाषणात  शेखर भाऊ दुंडे यांनी ५ ऑक्टोबर १५२५ रोजी बांदा येथे जन्मलेल्या महाराणी दुर्गावती यांचा जीवन पट थोडक्यात सांगितला. आपल्या पतीच्या निधनानंतर गोंडवाना भागाची जवाबदारी घेतल्यावर धर्म आणि राज्याची सुरक्षा करण्यासाठी अद्भुत साहस, पराक्रम व धैर्याने मुकाबला करत मुघल सेनेला चिरडून टाकणाऱ्या तसेच मुघल सैन्याला अनेकदा पराजित करणाऱ्या महाराणी दुर्गावती यांचा ५ ऑक्टोबर हा धैर्य दीन अथवा बलिदान दीन म्हणून साजरा केला जातो असे नमूद करीत राणी दुर्गावती साहस,

त्याग, विरता आणि नारीशक्ती ची अद्वितीय प्रतिमुर्ती होत्या असे सांगत मातृभूमीचे रक्षण व आत्मगौरवासाठी महाराणी दुर्गावती यांनी नारिशक्तीचे एक उत्तम उदाहरण दिले. मुघलांशी लढताना अखेर २४ जून १५६४ वीरमरण प्राप्त झाल्याचे सांगितले. यावेळी गावकरी महिला भगिनी व बांधव मोठ्या संख्येने उपस्थीत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: