पातूर – निशांत गवई
स्थानिक सुधाकरराव नाईक कला विज्ञान व उमाशंकर खेतान वाणिज्य विद्यालय अकोला येथे वनविभाग अकोला, किंग कोब्रा एडवेंचर अँड रिसर्च फाउंडेशन अकोला व सूर्य चंद्र फाउंडेशन बाभुळगाव यांच्या सौजन्याने वन्यजिव सप्ताह अंतर्गत अकोला जिल्ह्यातील वन्यजिव बचाव संस्था सर्पमित्र व निसर्ग जनजागृती साठी बहुमोल कार्य करीत असलेल्या संस्था व निसर्ग प्रेमी यांच्या सेवेची दखल घेत त्यांना अविरत निसर्ग सेवा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमामध्ये श्री स्वामी विवेकानंद विद्यालय हाता येथील मुख्याध्यापिका घाटे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व कलाशिक्षक संदीप शेवलकार यांच्या संकल्पनेतून वृक्ष रक्षाबंधन उपक्रम राबविल्याबद्दल अकोला वनविभाग व किंग कोब्रा ॲडवेंचर अँड रिसर्च सेंटर फाउंडेशन अकोला तर्फे वन्यजीव सप्ताह अंतर्गत अविरत निसर्ग सेवा पुरस्कार कलाशिक्षक संदीप शेवलकार यांना प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमामध्ये जिल्हा वन अधिकारी श्री ओवे साहेब यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य बोबडे सर सुधाकरराव नाईक कला वाणिज्य महाविद्यालय, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री अमोल सावंत संस्थापक अध्यक्ष निसर्ग कट्टा,श्री बाळ काळणे,मानद वन्य जीव रक्षक, प्रा.डॉ.नितीन देऊळकर , सूर्यचंद्र हॉस्पिटलचे संचालक श्रीकांत इंगळे, कार्यक्रमाकरिता जिल्ह्यातील सर्व सर्पमित्र व निसर्गप्रेमी उपस्थित होते.