नरखेड तालुका प्रतिनिधी
कोरोना संसर्ग रोखण्याकरिता देशात लॉक डाऊन लागले तेंव्हापासून नरखेड रेल्वे जंक्शन वरील एक्सप्रेस गाड्यांचे थांबे पूर्णता बंद आहे. रेल्वे च्या सर्व गाड्या पूर्वरत सुरू झाल्या परंतु नरखेड जंक्शन वरील सर्व एक्सप्रेस गाड्यांचे थांबे पूर्णता बंद आहेत. लोकडाऊन पूर्वी नरखेड स्थानकावर तीस पॅसेंजर व एक्सप्रेस गाड्यांचा थांबा होता. नरखेड वरून शिक्षण, रोजगार, आरोग्य सुविधेकरिता हजारो प्रवासी रेल्वे नि प्रवास करतात. नरखेड येथे जगप्रसिद्ध संत्रा मंडी असल्यामुळे उत्तर व दक्षिणेत जाणारे ही बरेच प्रवासी असतात. लोकडाऊन नंतर केवळ नागपुर-आमाला मेमो गाडी सुरू झाली. नरखेड व परिसराकरिता महत्वाच्या असलेल्या ग्रँड ट्रांक, दक्षिण, गोंडवाना, जबलपूर, छत्तीसगड एक्सप्रेस चे थांबे मात्र अजून पर्यंत मिळाले नाही.
थांब्याच्या मागणी करिता भाजप सह सर्वपक्षीय आंदोलन, निवेदन देऊन झालीत. केंद्रीय मंत्री ना नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , भाजप चे राज्य अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट शिष्टमंडळासह देशाचे रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव , रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी भेट घेऊन थांब्या बाबत चर्चा केली. थांब्याबाबत आश्वासन ही मिळाले. परंतु थांबे अजूनपर्यंत मिळाले नाही.
केंद्रात भाजपचे सरकार आहे त्यामुळे थांबा न मिळल्यामुळे स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना जनतेच्या आक्रोशाला बळी पडावे लागत आहे. तेंव्हा आता संघर्षाशिवाय पर्याय उरलेला नाही. पक्षाची सत्ता असंताना सुद्धा लोकांच्या हिताकरिता स्थानिक भाजपकडून आज पासून थांबे मिळेपर्यंत साखळी उपोषण करण्यात येत असल्याची माहिती भाजप महामंत्री ग्रामीण मनोज कोरडे, माजी तालुकाध्यक्ष शाम बारई, भाजप शहर अध्यक्ष संजय कामडे यांनी पत्रपरिषदेत दिली.
नरखेड शहर व परिसरातील नागरिकांच्या हितासाठी हे अहिंसात्मक आंदोलन उभे करत आहोत. सदर जनआंदोलनासाठी सर्व जनतेचा, व्यापारी संघटनेचा, सामाजिक संस्थेचा, सर्व राजकीय पक्षाचा सहभाग आणि पाठिंब्याची निश्चितच आवश्यकता आहे. करिता जन आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येनी सहभागी व्हावे असे आव्हानही करण्यात आले.
पत्रपरिषदेला भाजपा नागपूर जिल्हा महामंत्री मनोज कोरडे, श्याम बारई, संजय कामडे, धनराज खोडे, प्रशांत खुरसंगे, प्रमोद वैद्य, शरद मदनकर, अशोक कळंबे, रामचंद्र बागडे, सुनील सोनटक्के, लीलाधर रेवतकर, संदीप मेटकर,सामाजिक कार्यकर्ते राजेश क्षिरसागर, उमेश कळंबे, चंद्रशेखर कहाते आदी उपस्थित होते.