सांगली – ज्योती मोरे
सुरज फाउंडेशन येथे 23 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2022 या कालावधीमध्ये स्वच्छता सप्ताह व स्वच्छता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ आज येथे संपन्न होत आहे शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उंटवत असतानाच विद्यार्थ्यांचे सामाजिक आणि पर्यावरण विषयक जाणीव आणि जबाबदाऱ्या अंगीकृत करून देणे हेच या स्पर्धेचे उद्दिष्ट होते.
पर्यावरण विषय प्रश्नांचे ज्ञान असणारे व आपल्या कार्यातून जनमानसात पर्यावरण संवर्धन व रक्षण यासाठी सामाजिक बांधिलकी जपत नेचर कंजर्वेशन सोसायटीचे फाउंडर डॉक्टर हर्षद दिवेकर व मित्रमेळा संस्थेच्या माध्यमातून पर्यावरणासाठी भरीव आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारे हिमांशू लेले यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडली
याप्रसंगी प्रथम सरस्वतीचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व स्वच्छता गीत गाऊन कार्यक्रमास सुरुवात झाली स्वागत व प्रस्ताविक श्री प्रशांत चव्हाण उप प्राचार्य नव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यम यांनी केले त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये 23 सप्टेंबर पासून विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे स्वच्छता केली याची सविस्तर माहिती दिली त्याचबरोबर इतर संस्थेने सुद्धा चांगल्या प्रकारे स्वच्छता केल्याचे सांगितले त्यानंतर श्री हिमांशू लेले यांनी स्वच्छता म्हणजे काय हे विद्यार्थ्यांना पटवून सांगितले स्वच्छता म्हणजे आपल्या शेजारी असलेला कचरा तो दुसऱ्या ठिकाणी टाकने म्हणजे स्वच्छता नव्हे तर तो कचरा कसा तयार झाला व त्याचे विघटीकरण कसे करावे याचे सविस्तर माहिती सांगितले व विद्यार्थ्यांना प्लास्टिक कसे वेस्ट करता येईल यावर माहिती सांगितले त्यानंतर डॉ हर्षद दिवेकर यांनी सर्व संस्थेने केलेल्या स्वच्छता चा आढावा घेत अजूनही कशाप्रकारे स्वच्छता करता येईल याचे महत्त्व पटवून दिले.
या स्पर्धेसाठी सर्वांच संस्थेने उत्साहात सहभाग घेतला आपण सांगितल्याप्रमाणे बायोडिग्रीटेबल प्लास्टिक वेस्ट आणि ई वेस्ट याचे फॅब्रिकेशन करून त्याची स्वतंत्र सेंटर सुरू करण्यात आली अतिशय चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसर स्वच्छ करून क्लास डिस्प्ले आणि बोर्ड डिस्प्ले केले या स्पर्धेसाठी सर्वांचाच उत्साह व पुढाकार अतिशय वाखण्याजोगा होता या स्पर्धेमध्ये नव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यम यांनी प्रथम क्रमांक पटकावून प्रमाणपत्र व फिरता चषक पटकाविला त्यानंतर श्री विनायक जोशी यांनी आभार व्यक्त केले.
याप्रसंगी याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रवीणजी लुंकड यांनी शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर सौ संगीता पागनीस सुरज फाउंडेशनच्या संचालिका व प्राचार्य नव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यम सौ गीतांजली देशमुख पाटील एच आर सुरज फाउंडेशन श्री राजेंद्र पाचोरे आयटी इन्चार्ज सुरज फाउंडेशन श्री अधिक पवार प्राचार्य नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम सौ वंदना कुंभार मुख्याध्यापिका नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम प्राथमिक विभाग सौ योगेश्री सूर्यवंशी सहली ग्रुप संतोष बैरागी इन चार्जिंग कृष्णा व्हॅली गुरुकुल विभाग आदी शिक्षक व शिक्षकेतरी कर्मचारी उपस्थित होते.