पुण्यातील एका व्यक्तीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो दारूच्या नशेत होता आणि हॉटेलमध्ये पाण्याच्या बाटलीचे जास्त पैसे दिल्याने नाराज होता. त्याने दारू पिऊन खूप धिंगाणा घालतांना त्याने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून मुख्यमंत्र्यांनाच जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र, दुसरीकडे पोलिसांचं टेन्शन वाढवून दिल्याने मुख्यमंत्री शिंदे यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमक्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही, नुकतेच त्यांना धमकीचे पत्रही पाठवण्यात आले होते.
अविनाश वाघमारे (३६) असे आरोपीचे नाव असून तो मुंबई शहरातील रहिवासी आहे. लोणावळा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरनुसार, अविनाश मुंबईला जात असताना मध्यंतरी तो लोणावळ्यातील एका हॉटेलमध्ये थांबला. हॉटेलमध्ये मुक्कामाच्या वेळी दारूच्या नशेत असलेल्या आरोपीला हॉटेल व्यवस्थापकाने पाण्याच्या बाटलीसाठी जास्त पैसे घेतल्याने नाराज झाला.
रविवारी पहाटे २:४८ च्या सुमारास लोणावळा पोलीस नियंत्रण कक्षाला एका अज्ञात मोबाईल नंबरवरून कॉल आला, ज्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्या हत्येचा कट असल्याचा दावा करण्यात आला होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ मोबाईल नंबर ट्रेस केला आणि मालक मुंबईचा रहिवासी असल्याचे ओळखले. लवकरच गुन्हे शाखेचे एक पथक मुंबईला रवाना झाले आणि रविवारी घाटकोपर परिसरातून आरोपीला पकडले.
चौकशीत त्याने हॉटेल मॅनेजरला पाण्याच्या बाटलीसाठी जास्त पैसे घेण्यास धडा शिकवायचा असल्याचे सांगितले. आरोपीला अटक करण्यात आली आहे.