सांगली – ज्योती मोरे
दिनांक 29-9-2022 रोजी सांगलीच्या शासकीय विश्रामगृहात ॲड.गुणरत्न सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली व ॲड.जयश्री पाटील यांच्या अध्यक्षते खाली राज्य परिवहन महामंडळामध्ये नव्याने स्थापन झालेल्या एसटी कष्टकरी जनसंघ या संघटनेच्या सांगली विभागातील कार्यकारिणीची निवडीची व्यापक बैठक माजी आम. नितीन राजे शिंदे व श्री अविनाशजी मोहिते.उपाध्यक्ष प्रदेश भाजपा कामगार आघाडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी एसटी कष्टकरी जनसंघ या संघटनेची सांगली विभागीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.या मध्ये विभागीय अध्यक्षपदी श्री महेश शेळके व विभागीय सचिव पदी श्री राजू खैरमोडे यांची एकमताने निवड करण्यात आली.
या विभागीय कार्यकारणीतील पदाधिकारी पुढील प्रमाणे, कार्याध्यक्ष,श्री बाळासो गुरव, खजिनदार,श्री दिनेश माने, संघटक सचिव,श्री जगन्नाथ जावीर, महिला अध्यक्ष, सौ मीनाताई जाधव, महिला संघटक सचिव, पद्मावती खांडेकर, प्रसिद्धीप्रमुख, श्री रमेश ढमाळ, सल्लागार, श्री दगडू पटेल,सह सचिव, श्री सुरेश देशमुख, श्री विलास शिंदे,श्री सचिन जाधव आधी पदाधिकाऱ्यांची निवड विभागीय कार्यकारणी मध्ये एक मताने करण्यात आली आहे*.
या बैठकीत मार्गदर्शन करताना माजी आम. नितीन राजे शिंदे म्हणाले, राज्यातील एसटी कर्मचारी आपल्या न्याय मागण्यासाठी सर्व संघटनेचे बॅनर झुगारून, दुखवटा आंदोलनात एकजुटीने उभा राहिला.मान्यतेची लढाई आता कोर्टात गेली आहे.मात्र या आंदोलनात कामगारांना जेव्हढा त्रास झाला नाही.
तेवढा त्रास आंदोलनातून कामावर हजर झालेल्या कामगारांना एस टी च्या अधिकाऱ्यांच्या कडून होत आहे. तो ताबडतोब थांबवा अन्यथा या कामगारांच्या न्यायासाठी आम्हला रस्त्यावर उतरावे लागेल. ही गोष्ट संबंधित अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावी.राज्यात सरकार आपले आहे,आपल्या सर्व मागण्या आपण मंजूर करून घेऊ.
या वेळी श्री अविनाश मोहिते म्हणाले, आम्ही या संघटनेच्या पाठीशी ठाम असून सांगली विभागामध्ये आम्ही सर्व प्रयत्न करू,कामगारांच्या एकजुटीमुळे, आंदोलनामुळेचे कामगारांच्या पगारात वाढ झाली ही गोष्ट नाकारता येत नाही. हे आंदोलन मोडून काढणाऱ्या संघटनांना कामगारानी खड्यागत बाजूला काढून टाकण्याची आज वेळ आली आहे.
यावेळी विभागीय अध्यक्ष महेश शेळके म्हणाले, लवकरच विभागातील सर्व आगारातील कार्यकारिणी जाहीर केली जाईल. विभागातील कामगारांचा आम्हाला प्रचंड पाठिंबा आहे. सर्व ठिकाणी संघटनेच्या बोर्डाचे उद्घाटन केले जाईल.
संघटनेचे विभागीय सचिव राजू खैरमोडे म्हणाले, यापुढे कोणत्याही कामगारावर कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन करून घेतला जाणार नाही. इतर कुठल्याही संघटनेची मक्तेदारी, अरेरावी खपवून घेतली जाणार नाही.लवकरच संघटनेचे विभागीय मेळावा घेण्यात येईल. माजी आम.नितीन राजे शिंदे व श्री अविनाश मोहिते यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा हार पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी सुरेश माने, अशोक दिंडे, नदीम आगा, सदानंद मदने, पितांबर काळे, अशोक काळकुटे, घनश्याम पाटील, अजय मोरे, ज्ञानेश्वर सांगळे, संजय कुंभार, दीपक रायजाडे, शामराव पाटील, जगन्नाथ माळी, सौ बनसोडे, सोनवणे, आदी सर्व आगारातील प्रमुख पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते*.