Tuesday, November 5, 2024
Homeराजकीयनगरसेवक विनायक सिंहासने यांनी पक्ष आदेशाने दिला गटनेते पदाचा राजीनामा...

नगरसेवक विनायक सिंहासने यांनी पक्ष आदेशाने दिला गटनेते पदाचा राजीनामा…

सांगली – ज्योती मोरे

२०१८ मध्ये झालेल्या सांगली आणि मिरज कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जनतेने भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांना बहुमताने निवडून देऊन एकहाती सत्ता स्थापन करणेची संधी दिली होती.

त्यानंतर नगरसेवक युवराज बावडेकर व नगरसेवक विनायक सिंहासने यांना महानगरपालिकेमध्ये पक्षाचा गटनेता, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका या पदी काम करणेची संधी दिली. व त्यांच्या काळात महापालिकेचे गटनेतेबद्दल त्यांनी चांगल्या पद्धतीने सांभाळले होते आज नगरसेवक विनायक सिंहासने यांनी पक्ष आदेशाने गटनेते पदाचा राजीनामा भाजपा शहर जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे, आमदार सुधीरदादा गाडगीळ,

प्रदेश कार्यकारणी सदस्य शेखर इनामदार यांच्याकडे सुपूर्द केला व यापदावर काम करणेची संधी दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टी व सर्व सन्मानीय नेत्यांचा तसेच महानगरपालिकेतील भारतीय जनता पार्टीच्या सर्व सदस्यांचे मनपूर्वक आभार मानले. यावेळी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे, आमदार सुधीरदादा गाडगीळ, प्रदेश कार्यकारणी सदस्य शेखर इनामदार, उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: