श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय येथे दिनांक 29 /9 /2022 रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमराज देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार व्यक्तिमत्व,कौशल्य विकास व मार्गदर्शन कार्यशाळेचे करिअर कट्टाचे समन्वयक डॉ. एस.आर.पाटील व एनसीसी अधिकारी लेफ्ट.किरण पडघान यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले होते,
या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून पुणे येथील लक्ष्य इन्स्टिट्यूट आय सी टी चे संचालक डॉ. किशोर आंबेगावकर हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासात सकारात्मकता,भाषाशैली, शरीरयष्टी, राहणीमान या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे तसेच त्यांनी आर्मी, नेव्ही, एअरफोर्स साठी लागणाऱ्या जागा व त्या परीक्षांची तयारी कशी करावी याबद्दल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात डॉ. ओमराज देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणात आपण महाविद्यालयात या करियर कट्टाद्वारे विविध करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करून विविध तुमच्या व्यक्तिमत्व विकासात पैलू पाडण्यासाठी या ठिकाणी बोलवतो तसेच महाविद्यालयात वरिष्ठ व कनिष्ठ शाखेसाठी विभक्त असे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केलेले आहे.
त्याचा विद्यार्थ्यांनी सदुपयोग करून घ्यावा असे सांगितले.आयक्यूएसी समन्वयक डॉ. वनिता पोच्छी यांनी विद्यार्थ्यांनी मनोबल वाढवून त्याचा फायदा घ्या असे आव्हान केले.या कार्यक्रमासाठी एसपीएम कॉलेजच्या एनसीसी युनिट व लेफ्ट.शरद रावे, डॉ.विजय वाकोडे हे या कार्यक्रमासाठी आवरजून उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन लेफ्टनंट किरण पडघान यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. एस आर पाटील यांनी केले.या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी दोन्ही महाविद्यालयातील एनसीसी युनिट , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि परिश्रम घेतले.