सांगली – ज्योती मोरे
सध्या सांगली जिल्ह्यामध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असल्याने पोलीस अधीक्षक दीक्षित केला यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यासंदर्भात स्थानिक गुन्हे अनिव्हेशन शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांना आदेश दिले होते त्यानुसार शिंदे यांनी वेगवेगळी पथके तयार करून अशा गुन्ह्यांचा तपास सुरू केला आहे.
दरम्यान जत तालुक्यातील परिसरात पेट्रोलिंग करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील पोलीस अंमलदार राजू मुळे यांना शेगाव गावाजवळ एक जण संशयितरित्या फिरत असल्याची माहिती खास बातमीदारामार्फत मिळाली.
या बातमीच्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन सचिन दादू सुरवसे वय वर्षे 36 राहणार मंगळवेढा जिल्हा सोलापूर या दुचाकी चोरास ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागल्याने, पोलिसांना त्याचा संशय आला.
त्यानंतर अधिक चौकशी केल्यानंतर सुरवसे याने संबंधित दुचाकी शेगाव येथील एका किराणामालाच्या दुकानासमोरून चोरी केल्याचे कबूल केले. याशिवाय जत मधूनही एक गाडी चोरल्याचेही त्याने तपासा दरम्यान सांगितले. या दोन्हीही गाड्या जप्त करून पुढील तपासासाठी आरोपीस जत पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, दीपक गायकवाड, राजू मुळे, नागेश खरात, संजय पाटील, संदीप नलवडे, रुपेश होळकर आदींनी केली आहे.