Friday, November 22, 2024
Homeगुन्हेगारीAkola । महावितरण अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला ४ हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडले...अकोला...

Akola । महावितरण अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला ४ हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडले…अकोला ACB ची कारवाई…

अकोला: महावितरण अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन पवार याच्यावर आज दुपारी अकोला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करुन त्यास चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, यातील तक्रारदार यांनी १५ सप्टेंबर रोजी ला.प्र.वि. अकोला येथे आरोपी पवार विरूद्ध तकार दिली. तक्रारदार हे सोलर पॅनल बसवुन देण्याचे कामकाज करतात. सोलर पॅनल बसवुन दिल्यावर संबंधीत ग्राहक व म.रा.वि.वि.कंपनी यांचे मध्ये नेट मिटरींगचे चार अग्रीमेंट फाईलवर सहया करण्यासाठी आरोपी लोकसेवक नितीनकुमार पवार याने एका अग्रीमेंट फाईलवर सही करण्यासाठी दोन हजार रूपये प्रमाणे चार फाईलचे आठ हजार रुपयाची मागणी तक्रारदाराकडे मागणी केली.

अशा तक्रारीवरून १५ सप्टेंबर व २३ सप्टेंबर रोजी एसीबीने पडताळणी केली. यामध्ये आरोपी पवार याने तडजोडी अंती प्रत्येक फाईल एक हजार प्रमाणे चार हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. यावरून मंगळवार २७ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास एसीबीने सापळा रचला. यामध्ये आरोपीने तक्रारदारकडुन चार हजार रूपये लाचेची रक्कम स्विकारल्याने रंगेहाथ अडकला.

आरोपीस पंचासमक्ष लाचेच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले. कार्यालय म.रा.वि.वि.क. मर्या. शहर उपविभाग क्र. ३. अकोला मधील आरोपी लोकसेवक याचा कक्ष दुर्गा चौक, अकोला येथे ही कारवाई झाली. आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू असल्याची माहिती अँटी करप्शन ब्युरो अकोलाचे पोलीस उपअधीक्षक यु. व्ही. नामवाडे यांनी दिली

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: