Saturday, September 21, 2024
Homeविविध‘हॅप्पीएस्ट म्युझिक फेस्टिवल’ची घोषणा...हिप हॉप, रॉक, मेटल व इलेक्ट्रॉनिक परफॉर्मचा अनोखा संगम...

‘हॅप्पीएस्ट म्युझिक फेस्टिवल’ची घोषणा…हिप हॉप, रॉक, मेटल व इलेक्ट्रॉनिक परफॉर्मचा अनोखा संगम…

बकार्डी एनएच७ वीकेण्डरच्या २०२२ पर्वाचे यशस्वीरित्या आयोजन केल्यानंतर नॉडविन व बकार्डी २५, २६ व २७ नोव्हेंबर रोजी पुण्यात भारतातील ‘हॅप्पीएस्ट मल्टी-जेनर म्युझिक फेस्टिवल’चे आणखी एक पर्व सादर करण्यास सज्ज आहेत. या फेस्टिवलमध्ये ४० हून अधिक आर्टिस्ट्स विविध शैलींमधील ५ टप्प्यांमध्ये परफॉर्म करताना पाहायला मिळेल, जेथे गायक व गीतकार हिप हॉप, रॉक, मेटल व इलेक्ट्रॉनिक परफॉर्म करतील.

स्वदेशी, तसेच जगप्रसिद्ध आर्टिस्ट्सच्या लाइव्ह परफॉर्मन्समधून ३ दिवस उत्साहपूर्ण आनंद देत हा फेस्टिवल सर्व वयोगटातील प्रेक्षकांना खासरित्या क्युरेट केलेले फूड व ड्रिंक्स, सिग्नचेरच फेरीस व्हील, इंटरअॅक्टिव्ह ब्रॅण्ड एंगेजमेंट स्पेसेस,

धमाल व इंटरअॅक्टिव्ह फोटो ऑप्स आणि अर्थातच उत्तम संगीत व उत्तम उत्साहपूर्ण वातावारणाचा आनंद घेण्यास महालक्ष्मी लॉन्स येथे आमंत्रित करत आहे. या स्थळामध्ये पुन्हा एकदा उपलब्ध असणा-या प्रतिष्ठित मर्चंडाइजमध्ये वीकेण्डर मग, एनएच७ वीकेण्डर टी-शर्ट्स, बंटिंग्ज आणि दरवर्षी एनएच७ किट्सचा भाग असणा-या काही सर्वोत्तम स्टिकर्सचा समावेश आहे.

नॉडविन गेमिंगचे सह-संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक अक्षत राठी म्हणाले, ‘’आम्हाला आनंद होत आहे की, यंदा बकार्डी एनएच७ वीकेण्डर फेस्टिवल पुन्हा परतला आहे, ज्यामुळे आर्टिस्ट्स व चाहत्यांना एकत्र येऊन या फेस्टिव्ह उत्साहाचा आनंद घेता येईल.

आम्ही यंदा वर्षाच्या सुरूवातीला पुण्यामध्ये आमच्या मुख्य फेस्टिवलचे आयोजन केले. त्यानंतर जयपूर, हैदराबाद, गोवा, बेंगळुरू, कोलकाता व मुंबई येथे सिटी टेकओव्हर शोजचे आयोजन करण्यात आले आणि आता आम्ही पुन्हा एकदा विविध संस्कृतींचे संयोजन सादर करण्यास उत्सुक आहोत. चाहत्यांना या फेस्टिवलदरम्यान संगीत, फूड, कला व गेमिंगच्या विविध शैलींचा आनंद घेता येईल.

संगीतामध्ये सर्वांना एकत्र आणण्याची, दृढ नाते निर्माण करण्याची आणि वातावरण उत्साहपूर्ण करण्याची क्षमता आहे. दोन वर्षांच्या अंतरानंतर आमचे सर्व चाहते पुन्हा एकदा लाइव्ह इव्हेण्टचा आनंद घेण्यास उत्सुक आहेत. प्रेक्षक सुरक्षित व सुनिश्चित वातावरणामध्ये पूर्णत: समाधानासह फेस्टिवलचा आनंद घेण्याच्या खात्रीसाठी आम्ही सर्व खबरदारी देखील घेतली आहे. प्रेक्षकांप्रमाणेच आम्ही देखील ३ दिवस जल्लोष व उत्साहाचा आनंद घेण्यास आणि आमच्यासोबत काही जादुई, निरंतर आठवणी घेऊन जाण्यास उत्सुक आहोत.’’

बकार्डी एनएच७ वीकेण्डर हा नॉडविन गेमिंगचा आयपी आहे आणि बकार्डी एक्स्पेरिअन्सद्वारे सादर केला जातो. २०१० मध्ये पुण्यात या फेस्टिवलला सुरूवात झाली आणि तेव्हापासून शहराशी संलग्न राहिला आहे. नॉडविन गेमिंग ही नजारा टेक्नोलॉजीजची गेमिंग व ईस्पोर्ट्स शाखा आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: