२८ सप्टेंबर ते ५ ऑक्टोंबर दरम्यान उत्सवाचे आयोजन
रामटेक -: (तालुका प्रतिनिधी)
रामटेक : नागपुर-जबलपुर मार्गावर असलेल्या मनसर येथील प्रसिद्ध रामधाम येथे नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरू असून येथे येत्या २८ सप्टेंबर ते ५ ऑक्टोंबर दरम्यान हा उत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटक मित्र तथा रामधाम तिर्थाचे संस्थापक चंद्रपाल चौकसे यांनी माहिती देतांना सांगीतले.
दरम्यान २६ सप्टेंबरला सकाळी नऊ वाजता येथील माता वैष्णोदेवी मंदिरात विधिवत घटस्थापना केली जाणार आहे. दुपारी चार वाजता भक्तांच्या मनोकामना इच्छापूर्ती करिता अखंड मनोकामना ज्योत प्रज्वलित करण्यात येणार आहे. यावेळी पूजापाठ, सप्तिपाठ, आरती आदी. करण्यात येणार आहे. नवरात्रीचे पूर्ण नऊ दिवस दररोज भक्ती संगीत, माता जागरण, राज गरबा आदी. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
२६ सप्टेंबरला रात्री होम हवन तथा कन्या भोजन कार्यक्रम केल्या जाणार आहे. तेव्हा रामधाममध्ये होणाऱ्या नवरात्री उत्सवाला भक्तांनी भेट देण्याचे आवाहन रामधाम चे संस्थापक चंद्रपाल चौकशी यांनी केले आहे. रामधाम येथे विश्वातील सर्वात मोठ्या ओमची निर्मिती केल्या गेली आहे , ज्याचे नाव लिंका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. रामधाम येथे भाविकांना एकाच ठिकाणी बाबा अमरनाथ, द्वादश ज्योतिर्लिंग, अष्टविनायक, माता वैष्णोदेवी आणि विश्व प्रसिद्ध होम चे दर्शनासोबतच भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्णाच्या जीवन चरित्रावर आधारित झाकीया पहावयास मिळते. तसेच येथे शिव शिव १२ चे दर्शन घेता येईल.
यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित श्रीकृष्णाचे गौ प्रेम , गोवर्धन पर्वत , विष्णू लोक विराट दर्शन , सुवि बर्ड पार्क तथा लाईट हाऊस वॉटर पार्क इत्यादी अनेक दृश्य पहावयास मिळतात. तसेच भारतातील विविध क्षेत्रातून संग्रहित केलेले विविध प्रकारचे पाषाणाचे संग्रहालय आणि नंतर राजस्थान आणि इतर प्रांतातून आलेल्या लोक कलाकारांचे सामूहिक नृत्य , जादूचे खेळ , आदी मनोरंजक कार्यक्रमाद्वारे भाविकांचे मनोरंजन घडून येते. भारतीय संस्कृती आणि संस्काराचे दर्शन , कृष्णधाम व रामधाम येथे घडून येते.