Thursday, September 19, 2024
Homeराज्यसमाज कल्याण विभागाच्या वतीने ऑक्सिजन पार्क येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मृती भ्रंशदिन साजरा...

समाज कल्याण विभागाच्या वतीने ऑक्सिजन पार्क येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मृती भ्रंशदिन साजरा करण्यात आला…

कोल्हापूर प्रतिनिधी-राजेंद्र ढाले

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर कार्यालयाच्या वतीने राष्ट्रनेते ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत 21 सप्टेंबर जागतिक स्मृतिभ्रंश दीन साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमांमध्ये जेष्ठ नागरिकांसाठी डॉक्टर महावीर मिठारी तसेच डॉक्टर माहेश्वर शितोळे यांनी स्मृतीभंश होण्याची कारणे व त्यावरचे उपाय याबाबत मार्गदर्शन केले.

तसेच ज्येष्ठांच्या आरोग्याबाबत निर्माण होणाऱ्या अडचणी याबाबत मार्गदर्शन केले ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाइन एक चार पाच सहा सात बाबत माहिती देण्यात आली सदर कार्यक्रमाचे आयोजन ऑक्सिजन पार्क,राजारामपुरी आठवी गल्ली येथे करण्यात आले.

कार्यक्रमासाठी समाज कल्याण विभागाच्या समाज कल्याण निरीक्षक कल्पना पाटील लिपिक निलेश चौरे, तालुका समन्वयक सुरेखा डवर जिल्हा नगर ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाइनचे जिल्हा समन्वय श्री सागर कोगले, जिल्हा जेष्ठ नागरिक समन्वय समितीचे सदस्य श्री सी के नलवडे तसेच ऑक्सिजन पार्क कोल्हापूर राजारामपुरी मोफत योगा केंद्राचे प्रमुख प्रताप घेवडे योग गुरू चंद्रकांत झिरकांडे भारती जाधव दिलीप कुरळे बाळू जमसंडेकर अश्विनी कुलकर्णी राजश्री पोतदार यांचे सहकार्य लाभले

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: