महेंद्र गायकवाड
नांदेड
नांदेड : राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचा नांदेड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
रविवार 25 सप्टेंबर 2022 रोजी शिर्डी विमानतळ येथून श्री गुरू गोबिंदसिंघजी विमानतळ येथे सकाळी 10.15 वा. आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 10.30 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 11.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून वाहनाने खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानाकडे प्रयाण. सकाळी 11.45 वा. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नांदेड येथील निवासस्थानी सदिच्छा भेट व राखीव. दुपारी 12.45 वा. निवासस्थान येथून कौठा नांदेडकडे प्रयाण.
दुपारी 1 वा. सेवापंधरवाडा निमित्त कौठा येथे रक्तदान शिबिर कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 वा. कौठा येथून वाहनाने हदगावकडे प्रयाण. दुपारी 2.30 वा. हदगाव तालुक्यातील वाळकी बा. येथे आगमन व नागरी सत्कार सोहळा. दुपारी 3 वा. सेवा पंधरवडा अंतर्गत हदगाव तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीने बाधित शेतकऱ्यांसाठीच्या अनुदानाच्या धनादेशाचे बँकेस वितरण व प्रमाणपत्रांचे वितरण. दुपारी 3.30 वा. वाळकी बा. येथून वाहनाने माहूरकडे प्रयाण. सायं. 5.30 वा. शासकीय विश्रामगृह माहूरगड येथे आगमन व मुक्काम.
सोमवार 26 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7 ते 8.30 वाजेपर्यंत रेणुका मातेचे दर्शन. सकाळी 9 वा. माहूर येथून वाहनाने नांदेडकडे प्रयाण. सकाळी 11.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व खाजगी विमानाने प्रयाण.