कोकण – किरण बाथम
दि पेण को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या सुमारे दोन लाख ठेवीदारांना बारा वर्षानंतर ही न्याय न मिळाल्याने संतप्त झालेल्या ठेवीदारांनी अकार्यक्षम प्रशासन व बँकेत कोट्यावधीचा घोटाळा करणाऱ्यांचे श्राद्ध घालून निषेध व्यक्त केला आहे.
ठेवी आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या, निषेध असो निषेध असो बँक बुडव्यांचा निषेध असो, बँक बुडवणाऱ्या धारकरचा निषेध असो, मिळालाच पाहिजेत मिळालाच पाहिजेत आमच्या कष्टाच्या ठेवींची रक्कम आम्हाला मिळालीच पाहिजे अशा घोषणांनी पेण अर्बन बँकेच्या मुख्यालयाचा परिसर दणाणून गेला होता. यावेळी संतप्त ठेवीदारांनी बँक बँक बुडविणाऱ्यांचे श्राद्ध घालून व कार्यक्षम प्रशासनाचा निषेध केला. तसेच मागील बारा वर्षात मृत्युमुखी पडलेल्या पाचशेहून अधिक ठेवीदारांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
या आंदोलनात संघर्ष संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र जाधव, गजानन गायकर, दिलीप दुबे, पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील, माजी नगरसेवक प्रकाश पाटील, नगरसेवक अजय शिरसागर, विभावरी भावे, नामदेव कासार, अंकिता पोटे, कुंदा खरे, मनोहर पाटील, मोहन वेखंडे, बाळकृष्ण कमळकर, सुहासिनी कदम यांच्यासह ठेवीदार व जेष्ठ नागरिक सामील झाले होते.