पातूर – निशांत गवई
अकोला ते पातूर रोडवरील कापशी उड्डाण पुलाजवळ दोन दुचाकींच्या झालेल्या भीषण अपघातात दोन युवक जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाला. ही घटना गुरूवार, २१ नोव्हेंबरला रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली.
या अपघाताची माहिती होताच कापशी, चिखलगाव येथील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. तोपर्यंत त्यांनी मृतदेह उचलण्यास मनाई केली होती.
कापशी येथील उड्डाण पुलाजवळील एका बाजूचा सर्व्हिस रोड बंद असल्यामुळे येणारी व जाणारी वाहतूक एकाच बाजूने होत कापशी उड्डाण पुलाजवळील घटना; नागरिकांनी दोन तास केला रास्ता रोको असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली होती.
याबाबत दैनिका मधून वारंवार बातम्याही प्रकाशित केल्या आहेत. शेवटी गुरूवारी ही शक्यता खरी ठरली आहे. दोन दुचाकींचा भीषण अपघात होत यामध्ये चिखलगाव येथील आदेश चांदूरकर व गोपाल साबे हे दोन युवक जागीच ठार झाल्याची माहिती मिळाली आहे तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताची माहिती होताच
कापशी, चिखलगाव, शिंदखेड येथील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळावर धाव घेत रात्री रास्ता रोको करीत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत आणि तसे लेखी आश्वासन देण्यात येणार नाही, तोपर्यंत हा रास्ता रोको मागे घेणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता.
यावेळी एसडीओ, अकोला व पातूरचे तहसीलदार, पातूरचे ठाणेदार हनुमंत डोपेवाड तसेच आरसीपी पोलिस फोर्स घटनास्थळी दाखल झाली होती. रात्री उशिरापर्यंत रास्ता रोको सुरूच होता. यावेळी ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात संख्या होती.