Wednesday, October 30, 2024
HomeBreaking Newsआकोट मतदार संघात १९ नामांकन अर्ज वैध…३ अवैध…कोणते?...

आकोट मतदार संघात १९ नामांकन अर्ज वैध…३ अवैध…कोणते?…

आकोट – संजय आठवले

आकोट मतदार संघामध्ये नामांकन अर्ज भरण्याचे शेवटचे दिवशी एकूण २२ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. त्यानंतर दुसरी दिवशी झालेल्या छानणी मध्ये त्यातील १९ अर्ज स्वीकृत करण्यात आले असून ३ अर्ज बाद करण्यात आले आहेत.

नामांकन अर्ज स्वीकृत झालेल्या उमेदवारांची नावे येणेप्रमाणे- मनीष उर्फ महेश गणगणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, प्रकाश गुणवंत भारसाखळे भाजप, ॲड. सुजाता विद्यासागर वानखडे बसपा, कॅप्टन सुनील डोबाळे मनसे, दीपक रामदास बोडखे वंचित बहुजन आघाडी, यशपाल यशवंत चांदेकर पीपल्स पार्टी ऑफ इंडिया, ललित सुधाकरराव बहाळे स्वतंत्र भारत पक्ष, अन्सारऊल्लाखां अताऊल्ला खां अपक्ष, गजम्फरखा मुजफ्फरखा अपक्ष, डॉ. गजानन शेषराव महल्ले अपक्ष, गोपाल जीवनराव देशमुख अपक्ष, दिवाकर बळीराम गवई अपक्ष, देवेंद्र अशोकराव पायघन अपक्ष, नितीन मनोहर वालसिंगे अपक्ष, रामकृष्ण लक्ष्मण ढिगर अपक्ष, रामप्रभू गजानन तराळे अपक्ष, लक्ष्मीकांत गजानन कौठकर अपक्ष, सुभाष श्रीराम रौंदळे अपक्ष, सय्यद यावर अली मुकद्दर अली अपक्ष.

तर नामांकन अर्ज बाद झालेल्या उमेदवारांची नावे येणेप्रमाणे- अब्दुल सादिक अब्दुल खालिक अपक्ष, शेख मुजबूर रहमान अपक्ष, अशोक किसनराव थोरात अपक्ष. या निवडणूक प्रक्रियेमध्ये ४ नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर लगेच लढतीत कायम झालेल्या उमेदवारांना निवडणूक चिन्ह बहाल करण्यात येणार आहेत.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: