विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीमध्ये भाजपकडून सर्वाधिक 99 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. तर दुसऱ्या यादीमध्ये 22 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. आता भाजपकडून आपली तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे, यामध्ये 25 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आतापर्यंत भाजपनं तीन याद्यांमधून महायुतीमध्ये सर्वाधिक 146 उमेदवारांची घोषणा केली आहे.
गेल्या सात आठ दिवसापासून मूर्तिजापूर मतदारसंघात उमेदवारी बाबत अनेक नाट्यमय खेळ सुरू झाला होता मात्र अखेर त्यावर आज पडदा पडला असून भाजपचे हरीश पिंपळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर गेल्या दोन दिवसापासून या नाट्यमय घडामोडीवर अनेक दावे केलेले आता सर्व फोल ठरल्याचे दिसत आहे. हरीश पिंपळे यांचं पहिल्या यादीत नाव न आल्याने अनेकजण बुचकळ्यात पडले होते तर दुसर्या यादीतही नाव न आल्यामुळे आणखीन त्यांचा तणाव वाढला होता. मात्र काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी उद्रेक करत पक्षश्रेष्ठीकडे धाव घेतली आणि हरीश पिंपळे यांना संजीवनी दिली.
तर उद्या हरीश पिंपळे उद्या आपलं नामांकन दाखल करणार आहे. त्यापूर्वीच भाजप कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयावर आशीर्वाद रॅलीचा संदेश फिरवत होते. मात्र अनेकांना यावर विश्वास नसल्याने जोपर्यंत पक्षाकडून अधिकृत माहिती बाहेर येत नाही तोपर्यंत अनेकांनी हा संदेश फिरून थांबवले होते. मात्र वृत्तवाहिनीवर यादी जाहीर होताच अनेकांनी अभिनंदनचा वर्षा सुरू केला आहे. तर दुसऱ्या गटात पिंपळे यांना तिकीट मिळाल्याने नाराजीचा सूर असल्याचे समजते. हरीश पिंपळे यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये मदत करणार की नाही याची कोणीही शाश्वती घेत नाही एवढं मात्र नक्की आहे. संघ आता भाजपपासून अलिप्त होणार असल्याचे दिसत आहे. भाजप हरीश पिंपळे यांना राष्ट्रीय सेवा संघाकडून आधीच विरोध होता काही शहरातील स्थानिक नेत्यांचा सुद्धा विरोध होता मात्र आता तो विरोध कायम राहणार का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.