Friday, November 22, 2024
HomeBreaking NewsNCP अजित पवार गटाची 38 उमेदवारांची यादी जाहीर...अमरावती मधून सुलभा खोडके यांना...

NCP अजित पवार गटाची 38 उमेदवारांची यादी जाहीर…अमरावती मधून सुलभा खोडके यांना संधी…

NCP : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटाने 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यापूर्वी शिवसेनेच्या शिंदे गटाने ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. पक्षाने 95 टक्के आमदारांना आणखी एक संधी दिली आहे. नवाब मलिक आणि सना मलिक यांची नावे यादीत नाहीत. अजित पवार स्वतः बारामतीतून निवडणूक लढवणार आहेत. येवला मतदारसंघातून छगन भुजबळ निवडणूक लढवत आहेत.

बारामती- अजित पवार

आंबेगाव- दिलीप वळसे पाटील

अमरावती- सुलभा खोडके

इंदापूर- दत्तात्रय भरणे

पिंपरी- अण्णा बनसोडे

पाथरी- निर्मला विटेकर

मावळ – सुनील शेळके

येवला- छगन भुजबळ

कागल- हसन मुश्रीफ

सिन्नर – माणिकराव कोकाटे

श्रीवर्धन – अदिती तटकरे

उदगीर- संजय बनसोडे

अर्जुनी मोरगाव राजकुमार बडोले

माजलगाव- प्रकाश सोळंखे

वाई – मकरंद पाटील

खेड आळंदी- दिलीप मोहिते पाटील

अहमदनगर – संग्राम जगताप

इंदापूर- दत्तात्रय भरणे

अहमदपूर- बाबासाहेब पाटील

कळवण- नितीन पवार

कोपरगाव- आशुतोष काळे

अकोले- किरण लहामटे

वसमत – राजू नवघरे

चिपळूण- शेखर निकम

जुन्नर- अतुल बेनके

मोहोळ- यशवंत माने

हडपसर- चेतन तुपे

देवळाली- सरोज अहिरे

चंदगड- राजेश पाटील

इगतपुरी – हिरामण खोसकर

तुमसर- राजू कारेमोरे

पुसद- इंद्रनील नाईक

नवापूर- भरत गावित

मुंब्रा कळवा- नजीब मुल्ला

पहिल्या यादीतून महिलांना संधी
अजित पवार गटाच्या पहिल्या उमेदवार यादीत महिलांनादेखील संधी देण्यात आली आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना श्रीवर्धनमधून उमेदवारी देण्यात आली आहे. अमरावतीतून सुलभा खोडके यांना उमेदवारी जाहीर झालीय. सरोज अहिरे यांना देवळाली, तर पाथरीतून निर्मला विटेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: