Saturday, November 23, 2024
Homeराज्यअधिक्षकासह शिपाई, चौकीदाराला अटक, १८ पर्यंत पीसीआर...

अधिक्षकासह शिपाई, चौकीदाराला अटक, १८ पर्यंत पीसीआर…

वसतिगृहाची मान्यता होऊ शकते रद्द

१८ पर्यंत वसतिगृह अधीक्षक, शिपाई आणि चौकीदार यांचा पीसीआर…

रामटेक – राजु कापसे

रामटेक – शहरापासून आठ किमी अंतरावर मनसर-तुमसर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बोरी येथील इंदिरा गांधी वस्तीगृहाच्या चार विद्यार्थ्यांचे सोमवारी दुपारी पेंच कालव्यात बुडून मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून वसतिगृह अधीक्षक, शिपाई आणि चौकीदाराविरुद्ध रामटेक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. बुधवारी तिघांनाही न्यायालयात हजर करून पोलीसांनी १८ ऑक्टोबरपर्यंत पीसीआर मिळविला असून अशा स्थितीत आता वसतिगृहाची मान्यता रद्द होणार असल्याची चर्चा आहे.

इंदिरा गांधी वसतिगृहात राहणारे मनदिप अविनाश पाटिल रा. नागपूर वर्ग ११, अनंत योगेश सांबारे रा. नागपूर वर्ग ७ , मंयक कुणाल मेश्राम रा. नागपूर वर्ग ८, मयुर खुशाल बांगरे रा. नागपूर वर्ग ९ हे चारही विद्यार्थी सोमवारी त्यांच्या इतर मित्रांसह कालव्यावर अंघोळीसाठी गेले होते. कालवा पाण्याने भरलेला असल्याने व पाण्याचा प्रवाह अतिशय वेगात असल्याने त्यांचा तोल गेला आणि त्यांना पोहणे येत नसल्याने चारही विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला.

यानंतर कुटुंबीयांच्या तक्रारीवरून रामटेक पोलिसांनी वसतिगृहावर छापा टाकला.अधीक्षक, शिपाई आणि चौकीदारावर कारवाई करत तिघांनाही अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वसतिगृह अधीक्षक धनराज केशव महादुले (५२) चौकीदार कैलास रामसिंग वाढवे (२८) व शिपाई प्रशांत छत्रपती पाटील (३३) यांचा समावेश आहे. भारतीय न्यायिक संहिता 106 (1) आणि बाल न्याय संरक्षण आणि दक्षता कायद्याचे कलम 106 या तिन्ही विरुद्धकलम 2015 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

वॉर्डन विद्यार्थ्यांना खड्डे खणायला लावत होता

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी वसतिगृहातील वॉर्डन विद्यार्थ्यांना खड्डे खणायला लावत होता. खड्डे न बुजवल्यास बाहेर काढू, अशी धमकी वॉर्डनने विद्यार्थ्यांना दिली होती. वसतिगृहाच्या आवारात खोल खड्डा खोदल्यानंतर सर्व विद्यार्थी घामाने भिजले. वसतिगृहात बाथरूमची सुविधा नसल्याने विद्यार्थी वसतिगृहाच्या मागे काही अंतरावर असलेल्या कालव्यावर आंघोळीसाठी गेले असता चार विद्यार्थी अपघाताचे बळी ठरले. अपघाताच्या काही दिवसांपूर्वीच तेथील चपराशाने एका मुलाला मारहान केल्याचे रामटेक चे ठाणेदार आसाराम शेटे यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले.

वस्तीगृहात विहित मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन

वसतिगृहासाठी ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवमान करून समाजकल्याण विभागामार्फत चालविण्यात येत असलेल्या इंदिरा गांधी शासकीय मुला मुलींच्या वसतिगृहाची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेचे नागपूरचे समाज कल्याण अधिकारी किशोर वानखेडे यांनी आयुक्त, समाजकल्याण विभाग यांचेकडे पाठविला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या वसतिगृहात सुरक्षा व्यवस्थेच्या नावाखाली काहीही नव्हते आणि सीसीटीव्ही कॅमेरेही लावलेले नाहीत. वसतिगृहाची इमारत पूर्णपणे जीर्ण झाली असून काही ठिकाणी दरवाजाही नाही.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: