मूर्तिजापूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचा कोनशिला समारंभ रविवारी दिनांक ६ आॕक्टोबर ला दुपारी ४ वाजता कंझरा रोड वरील सालासर रिसॉर्ट मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भुषण रा. गवई यांच्या शुभहस्ते
आयोजित करण्यात आला आहे.
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल स. किलोर यांच्या अध्यक्षतेखालील या सोहळ्याला उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय,न्यायमूर्ती नितीन वा. सांबरे, न्यायमूर्ती भारती ह. डांगरे, न्यायमूर्ती विनय जोशी, न्यायमूर्ती अविनाश गुणवंत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहातील.
न्यायमूर्ती संजय ग. मेहरे, न्यायमूर्ती वनशिवराज गो. खोब्रागडे, न्यायमूर्ती सुनिल बा. शुक्रे, सुवर्णा कि. केवले, राजेश सु. तिवारी प्रधान सचिव व विधी परामर्शी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या समारंभास उपस्थित राहाण्याचे आवाहन येथील दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) आसीफ तांबोळी व वकील संघाचे अध्यक्ष ॲड. भूषण मुळे यांनी केले आहे.