Wednesday, October 16, 2024
Homeराजकीयचंद्रपूर | काँग्रेसच्या उमेदवारीसाठी २२ इच्छुकांची दावेदारी…जोरगेवारांचे राजकीय भवितव्य काँग्रेसचा उमेदवार ठरवणार?…

चंद्रपूर | काँग्रेसच्या उमेदवारीसाठी २२ इच्छुकांची दावेदारी…जोरगेवारांचे राजकीय भवितव्य काँग्रेसचा उमेदवार ठरवणार?…

वेध विधानसभेचा भाग-2

चंद्रपूर (नरेंद्र सोनारकर):चंद्रपूर विधानसभा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने काँग्रेस च्या उमेदवारीसाठी तब्ब्ल 22 लोक इच्छुक आहेत.या पैकी पक्ष कुणाला उमेदवारी देतो,याकडे सर्वांचे लक्ष लागले असून,पक्ष फोडाफोडीच्या राजकारणामुळे येथील लढत रंगतदार होणार असल्याची चिन्हे आहे.

2019 च्या निवडणुकीत विद्यमान आमदार किशोर जोरगेवार यांनी भाजपशी बंडखोरी करत आपली उमेदवारी दाखल केली होती.काँग्रेसची उमेदवारी मिळेल,ही आशा असतांनांनाच काँग्रेसने एन वेळेवर महेश मेंढे यांना अधिकृत उमेदारी दिली.त्यामुळं अचानक निवडणुकीचे संदर्भ बदलले.तत्कालीन आमदार नाना शामकुळे यांच्यावर भाजपने पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली.तर ‘आमदारकी लढणारच!’ ही भूमिका घेऊन किशोर जोरगेवार यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्धार केला…

काँग्रेसचे महेश मेंढे,भाजपचे नाना शामकुळे,अपक्ष किशोर जोरगेवार यांच्यात तिरंगी लढत होईल,असे सुरवातीचे चित्र होते.मात्र ‘नागपूरची पार्सल’ म्हणून नाना शामकुडे यांना मतदारांनी नापसंती दाखवणे सुरु केले.तर महेश मेंढे हे या विधानसभा क्षेत्रात अधिक कार्यतत्पर नसल्याने काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांनीही मेंढे यांचेकडे पाठ फिरवणे सुरु केले.जोरगेवार यांची समाजिक संघटना सर्व विधानसभा परिसरात जोमाने काम करत होती.जनतेची मोठी सिम्पती जोरगेवार यांच्या बाजूला असल्याचे दिसून येत होते…आणी झालेही तसेच.जोरगेवारांनी लाखोच्या वर मतदान घेत विरोधकांचा अक्षरशः धुव्वा उडवीत घवघवीत यश संपादन केले.अपक्ष आमदार म्हणून त्यांनी बाजी मारली…

मात्र यावेळी ही निवडणूक जोरगेवारांसाठी सोपी जाईल असे वाटत नाही.राज्याच्या सत्तापरिवर्तना नंतर जोरगेवार शिंदे सेनेचा भाग बनले.तरीही त्यांनी मागच्या निवडणुकी दरम्यान चंद्रपूरकरांसाठी 200 युनिट विजबील मोफत करण्याच्या आशश्वसनाची पूर्तता ते करू शकले नाही.त्यामुळे येथील मतदार त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे.भाजप,शिंदे सेना,अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची महायुती असली,आणी जोरगावर महायुतीचे उमेदवार असले तरीही भाजपचा पारंपरिक मतदार वगळता शिंदे सेना आणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे या विधानसभेत कुठलेच वजन नाही.त्यामुळे जोरगेवार यांना भाजप आणी आपल्या चांदा ब्रिगेड संघटनेच्या कार्यकर्त्यांवर अवलंबून राहावं लागणार आहे.त्यातच मागच्या वेळेसची काँग्रेस-भाजप वोरोधी आयती मते त्यांच्या झोडीत पडली होती.पण यावेळेस निवडणुकीचे संदर्भ वेगळे असल्याने सिम्पतीपूर्ण अतिरिक्त मतांची जोरगेवारांना आशा करता येणार नाही.काँग्रेस कोणता उमेदवार मैदानात उतरवतो,यावर जोरगेवार यांच्या जय पराज्याचे राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे.

या विधानसभेत काँग्रेसकडे तब्ब्ल 22 इच्छुकांनी उमेदवारी मागितली असली तरी राजू झोडे,अनिरुद्ध वनकर,प्रवीण पडवेकर, अश्विनी खोब्रागडे,डॉ.कांबळे यांची नावे सद्या चर्चेत आहेत.एकूणच या मतदार संघात यावेळी लढाईची चुरस बघायला मिळणार असून जोरगेवार आपला किल्ला वाचवतात की गमावतात हे पहाणे रंगतदार असणार आहे एवढे मात्र निश्चित..!

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: