Sunday, October 13, 2024
Homeविविधअमरावती | जीवन प्राधिकरण वर युवा सेनेची धडक...अंबा विहार परिसरात नवीन पाईप...

अमरावती | जीवन प्राधिकरण वर युवा सेनेची धडक…अंबा विहार परिसरात नवीन पाईप लाईन टाका…शाम धाने पाटील


अमरावती : गडगडेश्वर प्रभागाअंतर्गत येणाऱ्या अंबा विहार महालक्ष्मी नगर वल्लभ नगर छाया कॉलनी या भागात गेल्या चार ते पाच महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाली आहे. नागरिकांनी वारंवार तक्रार करून त्यावर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आज नागरिकांनी युवा सेना जिल्हाप्रमुखाकडे तक्रार केली असता यावर युवा सेना जिल्हाप्रमुख शाम धाने पाटील, उपमहानगर प्रमुख सुनील भाऊ राऊत, युवासेना उपजिल्हाप्रमुख पवन दळवी यांच्या नेतृत्वात अमरावती जीवन प्राधिकरण अधिकारी संजय लेवरकर साहेब यांना निवेदन दिले.

अंबा विहार परिसरात होणाऱ्या नागरिकांची समस्या त्वरित सोडवण्यासाठी गेल्या चार ते पाच महिन्यापासून दहा ते पंधरा मिनिटाच्या वरती नागरिकांना पाणी मिळत नसल्याने आज युवासेनेने आक्रमक पवित्रा घेऊन समस्त परिसराच्या समस्या सोडवण्यासाठी या भागातील 25 वर्षांपूर्वी असलेली पाईपलाईन बदलून नवीन पाईपलाईन करण्यासाठी निवेदन दिले आहे.

येणाऱ्या दोन ते तीन दिवसात परिसराच्या पाणीप्रश्न समस्या निकाली न निघाल्यास युवा सेना जीवन प्राधिकरण येथील अधिकाऱ्याच्या खुर्च्या फेकल्याशिवाय राहणार नाही असे शाम धाणे पाटील यांनी सांगितले शिवसेना उपमहानगर प्रमुख सुनील भाऊ राऊत युवासेना उपजिल्हाप्रमुख पवन दळवी सरचिटणीस ऋषीराज काकडे, भातकुली सरचिटणीस राहुल वानखडे, संदीप गुल्हाने, निलेश लाकडे, स्वप्निल ठाकरे, आनंद गिरी, अशोक भाऊ घेबळ, मनीष आडवीकर, अक्षय हूरबडे, मयूर गौड, मनोज ठाकरे, देशपांडे काका, संतोष मनोहर, पुरुषोत्तम हरडे, वैभव बगमारे, सागर माहुलकर सोहम सोळंके,युवा सेनेचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: