Wednesday, October 16, 2024
HomeBreaking Newsचंद्रपूर | अज्ञात ट्रक ने २४ वर्षीय युवकास चिरडले...युवकाचा घटनास्थळीच मृत्यू...

चंद्रपूर | अज्ञात ट्रक ने २४ वर्षीय युवकास चिरडले…युवकाचा घटनास्थळीच मृत्यू…

चंद्रपूर (जिल्हाप्रतिनिधी):
बल्लारपूर शहरात राहणाऱ्या आपल्या बहिणीला दुचाकीने आपल्या मित्रासह भेटायला येत असलेल्या युवकाला चंद्रपूरहून भरधाव येणाऱ्या ट्रक ने मागून जोरदार धडक दिली.ही दुर्दैवी घटना बल्लारपूर पेपर मिल गेट नं.सात च्या समोर आज दुपारी 12 च्या सुमारास घडली.

त्यात घोडपेठ निवासी भूषण राजू उमरगुंडावर (24) याच्या डोक्यावरून ट्रक चे चाक गेल्याने त्याचा घटना स्थळीच करुण अंत झाला… त्याचा मित्र सतीश लोखंडे रा, म्हतारदेवी, घुग्गुस जि, चंद्रपूर किरकोळ हा जख्मी असल्याचे असमजते.बल्लारपूर येथील शिवनगर वॉर्ड नाट्यगृह चा मागे मृतकाची बहीण व जावई राहतात. मुलीला भेटायला आधीच तिच्या कडे वडील आले होते.

भावाचा अपघाती मृत्यूची बातमी समजल्याने बहीण व जावई कृष्णा उप्पलवार व त्यांचे वर दुःखाचा डोंगर कोसळला.
बल्लारपूर पोलिसांनी अपघात स्थळ गाठून मृताकाचे शव ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदना करिता पाठवण्यात आले आहे.धडक देणाऱ्या अज्ञात ट्रक चा शोध बल्लारपूर पोलीस घेत आहेत.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: