Friday, November 22, 2024
HomeMarathi News Todayमूर्तिजापुर विधानसभेतील सरळ लढतीत भाजपच्या भाऊंना लोळवेल वंचित?...मग राष्ट्रवादीचे काय?...

मूर्तिजापुर विधानसभेतील सरळ लढतीत भाजपच्या भाऊंना लोळवेल वंचित?…मग राष्ट्रवादीचे काय?…

मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात भाजप आणि वंचित या दोन पक्षातच लढाई आतापर्यंत बघायला मिळाली आहे. मागील 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ने भाजपला शेवटच्या क्षणापर्यंत लढत दिली आणि वंचितचा निसटता पराभव झाला. मात्र यावेळी या मतदार संघातून भाजपचा सुपडा साफ होण्याचे चिन्ह सध्या दिसत आहे. त्याच श्रेय भाऊला जाते, भाऊने लाडक्या ठेकेदाराला मोठ करण्यासाठीच मेहनत घेतल्याने पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी बऱ्याच प्रमाणात नाराज असल्याचे माहिती आहे. एकेकाळी सत्ताधारी भाजप पक्षात गर्दी करणारे इच्छुक उमेदवार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होते. आता मात्र राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात दिसू लागले आहेत. भाजपकडे दोन तीन लोकांनी दावेदारी दाखल केली मात्र त्यांची ऍक्टिव्हिटी मतदार संघात फारशी दिसत नसल्याने पुन्हा भाऊला च तिकीट मिळणार की काय?. अश्या चर्चा मतदार संघात रंगू लागल्या.

भाऊ ने मतदार संघात केलेला विकास बघता आता येथील जनतेला एवढा मोठा विकास नको असल्याने सांगत आहेत. यावेळी भाजपच्या विरोधात जनता, शेतकरी वर्ग गेल्याने यावेळी याचा फटका भाजपला या मतदार संघात बसणार आहे. मग पंतप्रधान नरेद्र मोदी जरी प्रचाराला आले तरी. एवढी प्रचंड नाराजी या मतदार संघात आहे. एवढच नाहीतर मतदार संघातील भाजपचे बूथ प्रमुख बदल्याने सुद्धा नाराजी दिसत आहे. सोबतच मागील निवडणुकीत एका मराठा नेत्याचा डीएनए काढल्याने तो मुद्दा सुद्धा यावेळी निवडणुकीत बघायला मिळणार आहे आणि त्याचा रोष मतपेटीवर दिसणार आहे. त्यामुळेच भाजप आता पर्यायी उमेदवार देणार असल्याचे बोलले जाते. या मतदारसंघातील प्रमुख पक्ष म्हणून भाजप आणि वंचित हे दोनच दावेदार असून आणि लढाई मात्र या दोनच पक्षात पाहायला मिळणार आहे आणि आजपर्यंत मिळाली सुद्धा आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही वंचित आणि भाजप मधेच लढाई होणार असल्याचे राजकीय तज्ञ सांगत आहे. कारण राष्ट्रवादी पक्षाचा नेमका कोणता मतदार आहे आहे हे सुद्धा कळायला मार्ग नाहीये कारण राष्ट्रवादी पक्षाचे काही मोठे नेते स्वतःच भाजपला मतदान करतात आणि इतरांनाही करायला लावतात त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचा मतदार नेमका कोणता? हे न समजणार कोड आहे.

याचाच फायदा घेत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या काही इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघात कार्यक्रमाचा सपाटा सुरु केला आहे. कधी न पाहिलेले चेहरे या मतदार संघात दिसू लागले आणि मोठे समाज सेवक बनले. मतदार संघात चमकोगिरी करून आपले नाव करण्याचा प्रयत्न करीत आहे. एवढच काय तर एक महाशय चक्क बाहेरच्या जिल्ह्यातून येवून एका झिपर्या बाईचा कार्यक्रम ठेवून आणि त्याच बाई बरोबर नाचून हिरो बनण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शहरातील सुज्ञ जनतेने त्याचा हेतू ओळखून त्याला लगेच विसरले सुध्दा. त्याने पक्षाच्या दोन चार दलालांना सोबत ठेवून आपली नाच्चकी करून घेतली असल्याचे बोलले जात आहे. तर मतदार संघातील जनता याला भिक न घातल्याने आता तो इतरांच्या कार्यक्रमात हजेरी लावून लोकांचे स्वतःकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र याला मतदार संघात कुत्रही ओळखत नसल्याने त्याचा युवा नेता फक्त त्याच्याकडून माल अंदर करत असल्याचे चर्चा शहरात मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष केवळ एक वेळाच या मतदार संघातून निवडून आला, सर्वात जास्त भाजपने बाजी मारली आहे. गेल्या तीन टर्म मध्ये मतदारसंघातून सतत तीन वेळा निवडून आल्याने या पक्षाने मतदार संघात मोठ वलय निर्माण केल होत तर पूर्वीचा भारिप बहुजन या पक्षाला एकदा या मतदारसंघात प्रतिनिधित्व करायला चान्स मिळाला आहे. मात्र वंचित कडे आता आणखीन सुवर्णसंधी येत आहे त्यांनी जर ओळखीचा चेहरा या मतदारसंघाला दिला तर निवडून येण्याची शक्यता वाढणार आहे. गेल्या विधानसभेच्या तीन टर्म मध्ये वंचित आणि भाजप यांच्यातच लढत झाल्याचं पाहायला मिळाली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे काही भावी उमेदवार पिसाटल्यासारखे झाले असून प्रसिद्धीसाठी ते विविध कार्यक्रमाचे आयोजन करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहे. पक्षाची तिकीट मिळणार की नाही, त्याआधीच अनेक नवरदेव होऊन बसले आहेत. मात्र हा मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचा नसून या ठिकाणी तीन वेळा राष्ट्रवादीला तिसऱ्या क्रमांकावर रहावे लागले तर यावेळी तिसरी आघाडी आल्याने आणखी मतांची विभागणी होणार असल्याने राष्ट्रवादीचा कोणता क्रमांक लागणार हे वेळच सांगणार आहे….क्रमशः

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: