Thursday, September 19, 2024
Homeगुन्हेगारीरामटेक । निंदन करतांना वाघाचा महिलेवर हल्ला… फरपटत नेऊन शरीराचे केले दोन...

रामटेक । निंदन करतांना वाघाचा महिलेवर हल्ला… फरपटत नेऊन शरीराचे केले दोन तुकडे…

पवनी वनपरीक्षेत्रातील बफर झोन क्षेत्रा जवळील झिंझेरिया शेतशिवारातील घटना

राजु कापसे
रामटेक

रामटेक : वन्य प्राण्यांचे मानवी हल्ले थांबण्याचे चिन्हे सध्या तरी दिसून येत नाहीये. त्याच्यात दिवसेंगणिक वाढत होत चाललेली आहे. अशीच एक घटना आज दिनांक १७ सप्टेंबरला देवलापर भागातील झिंजरिया शेत शिवारात दुपारी साडेपाच दरम्यान घडली. हा भाग पवनी वनपरिक्षेत्राचे बफर झोन मध्ये येतो. ५५ वर्षीय महिला आपल्या शेतात निंदन करत असताना अचानक वाघाने तिच्यावर हल्ला चढविला व तिला फरफटत जंगलात नेले व तिला ठार मारून तिचे दोन तुकडे केल्याची घटना आज दुपारी साडेपाच च्या सुमारास घडली.

मीताबाई बुध्दु कुंभरे रा झीझेंरीया वय ५५ वर्ष असे मृतक महिलेचे नाव असून ती व तिचा पती आज जंगलाला लागून असलेल्या त्यांच्या शेतामध्ये निंदन करण्यासाठी गेलेले होते. सिंदेवानी येथील हा भाग पवनी वनपरिक्षेत्र अंतर्गत बफर झोन ला लागून येतो. महिला निंदण करीत असताना अचानक वाघाने तिच्यावर हल्ला केला व तिला फरफटात जंगलाकडे नेले व येथे महिलेला ठार मारून तिचे दोन तुकडे केले यावेळी धड वेगळे होते तर शीर वेगळे होते. घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरली तोच तेथे लोकांचा लवाजमा उपस्थित झाला. आरडा ओरड सुरू झाली महिलेला कुठे नेले आहे हे कळेनासे झाले होते. सायंकाळ होऊनही वन विभागाची टीम घटनास्थळी पोहोचली नव्हती त्यामुळे लोकांचे यावेळी उग्ररूप होण्यास सुरुवात झालेली होती.

वन विभागाचे टीम येत पर्यंत भीतीपोटी लोकांनी काड्यांना आग लावून त्यामध्ये वेळ काढला. वारंवार वन्य प्राण्यांचे मानवावर होणारे हल्ले यामुळे लोक अगोदरच खूप संतापलेल्या मुद्रेमध्ये आहे भरीस भर म्हणजे आजच्या या घटनेने नागरिक स्वतःला असुरक्षित समजत आहे. तथा धास्तावलेले सुद्धा आहे तसेच विशेष म्हणजे लोकांची वन विभागावर खूप मोठी नाराजी आहे वन विभागाच्या विविध उपाय योजना फोल ठरत आहे. शोकांतिका म्हणजे आजच्या घटनेमध्ये ठार झालेल्या महिलेचा मुलगा हा अपघातामध्ये मरण पावला सध्या ही महिला आणि तिचा पती असे दोघेच आपला संसारगाडा चालवत होते आता महिलेच्या मृत्यूने तिचा पती एकटाच राहिलेला आहे तेव्हा त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

याच वाघाचा हा दुसरा हल्ला
नुकतेच काही दिवसांपूर्वी सकाळी १०.३० वाजता शेतात फवारणी करतेवेळी श्याम दिलीप सीरसाम यांच्यावर ह्याच वाघाने हल्ला चढवला होता सुदैवाने तो बचावला. तेव्हा गावातील लोकांनी वन विभागाला माहिती दिली परंतु वनविभागाचे कर्मचारी आले व फटाके फोडून निघुन गेले होते. आजच्या घटनेबाबत वनविभागाच्या नीस्काळजीपनाने महीलेचा जीव गेला असे गावातील लोकांचे मत आहे. घटना घडल्यावर मोठा कालावधी निघून गेल्यावरही वन विभागाचे कोणतेच अधिकारी घटनास्थळी दाखल झाले नव्हते हे उल्लेखनीय.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: