निशांत गवई, पातूर
पातूर : वृक्ष लागवडीचे देयक काढण्यासाठी पातुर पंचायत समितीचे अभियंता व संगणक चालक या दोघांनी एका रोजगार सेवकाकडून फोन पेवर पैशे स्वीकारल्या बाबतची तक्रार रोजगार सेवकाने ६ सप्टेंबर रोजी लाच लुचपत विभाग, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्याकडे दिलेल्या तक्रारीतून केला आहे. त्यामुळे अभियंता व संगणक चालक या दोघांचे धाबे दणाणले असून, सदर प्रकरण आपसात मिटविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहे. वृक्ष लागवडीचे देयक काढण्यासाठी पैशाची मागणी पूर्ण न केल्यास देयक हेतूप्रस्पर थांबविले जातात, त्यामुळे दबावापोटी वृक्ष लागवडीचे देयक काढण्यासाठी रोजगार सेवकाने फोन पे वर पैशाची मागणी पूर्ण केली असा आरोप रोजगार सेवकाने दिलेल्या तक्रारीतून केला आहे.
अभियंता व ऑपरेटर यांच्या खात्याची चौकशी करा !
पातुर तालुक्यात लाचखोरीमुळे वृक्ष लागवडीच्या मोहिमेचा फच्चा उडाल्याचे चित्र आहे. वृक्ष लागवडीचे देयक काढण्यासाठी अभियंता व ऑपरेटर यांनी किती लोकांकडून पैशे स्वीकारले याबाबत दोघांच्या खात्याची चौकशी केल्यास मोठे गोडबंगाल समोर येण्याची दाट शक्यता आहे.