रामटेक : गांधी वार्ड रामटेक येथील डॉ.अंशूजा किंमतकर यानी आगळा वेगळा उपक्रम करीत इंजेक्शनच्या वायलच्या ( बॉटलच्या) प्लास्टिक झाकणा पासुन सुंदर गणपती तयार करुन त्यानी आपल्या दवाखाना मधे स्थापना केली।गणपती पाहन्या करिता लोकांची गर्दी होत आहे।
डॉ.अंशूजा किंमतकर यानी आगळा वेगळा उपक्रम करीत असतात। त्या लिंका बुक रेकॉर्ड होल्डर आहेत। 2019 मधे अनेक टाकावू वस्तूंपासून ग्रीटिंग कार्ड तयार करणे व गणपती तयार करण्या साठी लिमका बुक ऑफ रिकॉर्ड मध्ये नाव नोंद आहे. मागील तीन वर्षांपासून दरवर्षी गणेश उत्सव निमित्त विविध प्रकारच्या वस्तूंपासून गणपती तयार करत आहे। 2022 ला डिस्पोसिबल ग्लास चा गणपती तयार केला होता। 2023 ला शिंपल्यांपासून गणपती तयार केला होता। मातृका फाउंडेशन व रामटेक सृस्टि सौंदर्य ग्रुप च्या माध्यमातुन वृक्षारोपण, महिलाना क्रिकेट शिकवने, पोहने शिकवने, साइकिलिंग करने, स्वास्थ शिविर घेने, साहसिक शिबिर घेने सहित विविध्य उपक्रम चलवितात।
यावर्षी 2024 ला इंजेक्शनच्या वायला ( बॉटलच्या) जे वरचे झाकण रंगीबिरंगी येतात त्या झाकणांपासून गणपती तयार केला आहे. व्यवसायाने डॉक्टर असल्यामुळे रोज दवाखान्यामध्ये इंजेक्शन पेशंटला लावतात । त्या इंजेक्शनच्या वायलला वेगवेगळ्या रंगाचे सुंदर झाकणं असतात आणि ते फेकून देता जमा करून गणपती तयार केला।
झाकणांपासून तयार केलेला गणपती विदर्भात पहिल्यांदाच असावा.डॉ. अंशूजा किंमतकर म्हणाल्या की वेगळे वेगळे छंद जोपासन्यातून टाकावू वस्तु पासुन कलाकृति तयार होतात।