Friday, November 22, 2024
Homeराज्यप्रमुख पाहुणे म्हणून आले आणि रक्तदान करून गेले - राजू मदनकर...

प्रमुख पाहुणे म्हणून आले आणि रक्तदान करून गेले – राजू मदनकर…

परमात्मा एक सेवक ग्रुप तर्फे आश्रमात रक्तदान शिबीर संपन्न

रामटेक – राजू कापसे

मौदा (ताप्र) : रक्तदान करणे हा आपल्या अत्यंत जवळचा आणि जिव्हाळ्याचा विषय असल्याचे सांगत मौदा तहसीलदार धनंजय देशमुख व नायब तहसीलदार नवनाथ कातकडे यांनी क्षणाचाही विलंब न करता रक्तदान केले. यावर निस्वार्थ भावनेने रक्तदान कसे करायचे हा एक ज्वलंत उदाहरण आहे.

प्रमुख पाहुणे म्हणून आले आणि रक्तदान करून गेले असे गौरवोद्गार परमात्मा एक मंडळाचे अध्यक्ष राजू मदनकर यांनी व्यक्त केले. व ऑनलाइन कार्य करणाऱ्या तरुण सेवकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

परमात्मा एक ऑनलाइन व्हाट्सऍप ग्रुपच्या वतीने शुक्रवार दि.६ सप्टेंबर रोजी मौदा येथील परमात्मा एक आश्रमात मंडळाचे अध्यक्ष राजू मदनकर यांच्या मार्गदर्शनाखाली मानवधर्मावर आधारीत स्पर्धा परीक्षा, मानवधर्म परिचय, आरोग्य तपासणी व भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते सेवकांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार धनंजय देशमुख, नायब तहसीलदार नवनाथ कातकडे तसेच मंडळाचे सहसचिव मोरेश्वर गभने, संचालक टिकाराम भेंडाळकर, माजी संचालक संजय वाघमारे, परमात्मा एक ग्रुप ऍडमिन विनायक रोकडे, सह व्यवस्थापक पांडुरंग शेंडे, सागर मदनकर, डॉ. जितेंद्र मानकर, नेताजी कांबळे उपस्थित होते.

परमात्मा एक व्हाट्सऍप ग्रुप २०१६ पासून कार्यान्वित असून रक्तदान शिबीर व इतर स्पर्धा निरंतर आयोजित करीत आहे. आतापर्यंत 3 लाखाच्या वर सेवकांना मोफत सेवा केली आहे. ह्या ग्रुपच्या माद्यमातून अनेक देशामध्ये सुमारे ६०० सेवक जुडलेले आहेत.

प्रत्येकवेळी प्रत्येक क्षणी कुठलाही सेवक अडचणीत असला तर वेळेवर मार्गदर्शन होऊन मदत केली जात असल्याची माहिती जिवन पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून दिली आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मंगेश संग्रामे यांनी तर आभारप्रदर्शन महेंद्र चाचेरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उमाकांत मानकर, कैलास सोमनाथे व इतर सेवकांनी केले आहे.

५६ रक्तदात्यांनी रक्तदान व ४८ स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला

या शिबिरात एकूण रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्त संकलनाचे काम नागपूर येथील डागा शासकीय रक्तपेढी वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार झाडे व त्यांचे सहकारी स्वप्निल चौधरी, प्रवीण भटकर, वंदना झोडे, नागनाथ मोरे, मोनीश शिंगने व विजय तलमले यांनी काम पाहिले.

तसेच आयोजित स्पर्धेत ४८ सेवकांनी सहभाग घेतला यातील प्रथम क्रमांक राजू हटवार, द्वितीय क्रमांक धनंजय जीभकाटे व तृतीय क्रमांक मनीषा लांडगे यांनी पटकाविला. रक्तदाते व स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: