पातूर – निशांत गवई
जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अधिकारी , कर्मचारी संघटनेच्या वतीने २९ ऑगस्ट पासून बेमुदत संप पुकारला आहे.
या बाबतचे निवेदन संघटनेने मार्फत मुख्याधिकारी सैय्यद एहसनुद्दिन यांना देण्यात आले आहे.नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या बहुतांश प्रलंबित मागण्याबाबत शासन – प्रशासन प्रमुखाकडील बैठकामध्ये वारंवार चर्चा झाली तरी देखील प्रत्यक्ष निर्णय होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष आहे.
या संपात महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटना यांच्या बेमुदत संपास नगरपालिका कर्मचारी कर्मचारी संघटनेचा पूर्ण पाठिंबा देण्यात आला आहे .जुनी पेन्शन व इतर प्रलंबित मागण्या जसे कोषागार मार्फत वेतन लागू करणे व इतर मागण्या लागु न झाल्यास संघटना बेमुदत संप चालू ठेवणार असल्याचे निवेदनात सांगितले होते.
या बेमुदत संपाचा भाग म्हणून२९ऑगस्ट पासून कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवत मुख्य प्रवेशद्वारावर बसून घोषणाबाजी करीत विरोध प्रदर्शन केले. मुख्यमंत्री यांच्या अधिपत्याखाली असलेल्या नगर विकास विभाग यावेळी आशिष भगत न. प.संवर्ग अधिकारी संघटना पातूर अध्यक्ष, महेश राठोड उपाध्यक्ष , सुरज ताथोडे लेखापरीक्षक, भूषण रोकडे लेखापाल सह संवर्गातील अधिकाऱ्यां समवेत सहभागी होते.नगर परिषद कर्मचारी संघटना अध्यक्ष सैय्यद रसूल यांनी पाठींबा दर्शविला आहे.