महावितरण कंपनीच्या बेताल कारभाराचा नाेंदवला निषेध; पाेलिसांचीही धाव…
पातूर – निशांत गवई
पातूर तालुक्यात वारंवार विद्युत पुरवठा खंडीत हाेत असून, मंगळवारी १२ गावातील ग्रामस्थांच्या संयमाचा बांध फुटला. विद्युत पुरवडा खंडीत झाल्याने रात्री ९ वाजताच्या सुमारास ग्रामस्थांनी थेट महावितरण कंपनीच्या आलेगाव येथील ३३ केव्ही केंद्रावर धडक दिली. ग्रामस्थांनी महावितरण कंपनीच्या बेताल काराभावर संताप व्यक्त करीत तेथेच ठिय्या दिला.
पातूर तालुक्यात अनेकदा वारंंवार विद्युत पुरवठा खंडीत हाेताे.
महावितरणकडून ग्राहकांना काेणीतीही पूर्वसूचना देण्यात येत नाही. विद्युत पुरवठा का खंडीत झाला, सुरळीत केव्हा हाेईल, याची माहितीच ग्रामस्थांना मिळत नाही. अनेकदा तर रात्रभर पुरवठा खंडित राहताे, असे ग्रामस्थांचे म्हणणे असते. दरम्यान विद्युत पुरवठा वारंवार खंडित हाेत असल्याचे चाेंढी येथील ग्रामस्थांनी १९ ऑगस्ट राेजी रात्री आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी थेट आलेगाव येथील उपकेंद्रावर धडक दिली. यावेळी ५० ते ६० ग्रामस्थांसह सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्तेही हाेते.
या ठिकाणचा पुरवठा खंडीत
चोंढी पिंपळडाेळी, पांढुर्णा, चारमोडी, सोनुना, उंबरवाडी, नवेगाव आंधरसावंगी, जांब, पाचारण, भौरद, घोटमाल, चोढी पेडका आदीसह गावातील िवद्युत पुरवठा खंडीत झाली. आलेगाव गोळेगाव या फिडरवरही अनेक वेळा दर तासाला विद्युत पुरवठा खंडित झाला. चोंढी फिडरवरून बहुतांश गाव आदिवासी बहुल भागात विद्युत पुरवठा हाेताे. हा जंगल परिसर असून, वारंवार िवद्युत पुरवठा खंडीत हाेताे.
प्रयत्न सुरु
चाेंढी फिडरवर डिक्स इन्सुलटर फुटले होते. संबंधित कंत्राटराला तंत्रज्ञ मिळाले नाहीत. त्यामुळे कॅपिटल ब्रेक डाऊन होता. आता तीन गावांमध्ये विद्युत पुरवठा पूर्ववत झाला असून, उर्वरित गावांमध्येही पुरवठा लवकरच सुरळीत हाेईल, असे प्रभारी अभियंता राेशन साटिंगे म्हणाले.
पाेलिसांनी धाव; ग्रामस्थ ठाम
विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाल्याची माहिती मिळताच चान्नी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाेलिसांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्व गावांमधील विद्युत पुरवठा सुरू हाेईपर्यंत ठिय्या आंदाेलन मागे घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. स्थानिक अभियंता सुट्टीवर असून, दुसऱ्या ठिकाणच्या अभियंत्यांकडे प्रभार आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा तातडीने हाेण्यासाठी नेमकी जबाबदारी काेण घेणार, असा सवाल ग्रामस्थांनी केला.
फरक पडेना
पातूर तालुक्यात वारंवार विद्युत पुरवठा खंडीत हाेत असून, याचा निषेध करून जून महिन्यात युवा सेनेने महावितरण कंपनीच्या अभियंत्यांना कंदिल भेट दिला हाेता. ही समस्या तातडीने निकाली न निघाल्यास आंदाेलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला हाेता. मात्र त्यानंतर मंगळवारी तर १२ गावांमधील विद्युत पुरवठा खंडीत झाला.