रामटेक – राजु कापसे
रामटेक वन परिक्षेत्रातील श्री. मिताराम सव्वालाख रा. रामटेक यांच्या शेतात नुकत्याच घडलेल्या घटनेत एक बिबट्याने त्यांच्या शेतातील घोड्याच्या तीन महिन्याच्या बछड्यावर हल्ला करून त्याला ठार केले आहे. ही घटना त्यांच्या घोड्याच्या थांबणी दरम्यान घडली.
वनविभागाला माहिती मिळताच, श्री. ए. बी. भगत, वनपरिक्षेत्र अधिकारी रामटेक, यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. बी. एन. गोमासे, क्षेत्र सहायक रामटेक, आणि श्री. दिलीप जाधव, वनरक्षक रामटेक, यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन मौका पंचनामा केला आहे आणि पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
श्री. ए. बी. भगत यांनी यावर विश्वास दिला आहे की, पशुमालक श्री. मिताराम सव्वालाख यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. वनविभाग शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा असून, अशा प्रकारच्या घटनांमध्ये तातडीने कारवाई करणे आणि आवश्यक ती मदत देणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे.
वन्यजीव हल्ले रोखण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी वनविभागाने आवश्यक ती पावले उचलण्याचा निर्धार केला आहे. यासाठी नागरिकांनीही सतर्क राहून आपल्या शेतात आणि आजूबाजूच्या क्षेत्रात विशेष लक्ष द्यावे.