रामटेक – राजू कापसे
श्री सीतारामदास महाराज अंबाला यांची 55 वी पुण्यतिथी श्रावण शुक्ल सप्तमीला 11 ऑगस्टला रोजी श्री भगवान लक्ष्मीनारायण मंदिर अंबाला येथे विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. सकाळी 6.30 वाजता पार्थिव शिवलिंगाचा अभिषेक, सकाळी 9 वाजल्यापासून हवन, आरती व दुपारपासुन महाप्रसादची सुरूआत झाली. पुण्यतिथी निमित्य आरोग शिबिरचे आयोजन करण्यात आले।
श्री सीतारामदास महाराज हे थोर संत होते. ते राघव कुंड गुफ़ा खाक चौक अंबाला येथे राहत होता. त्यांच्यासोबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजही राहत होते. श्री सीतारामदास महाराज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रामटेक येथे 40 हजार चौरस फुटाचे सुसज्ज योगीराज रुग्णालय जनतेच्या सेवेसाठी बांधण्यात आले आहे.
मध्य प्रदेशातील मंडला आणि अमरकंटक येथे लक्ष्मीनारायण मंदिर राघव कुंड गुफ़ा, आश्रम, अंबाळा सारखीच बांधण्यात आली आहे. स्वामीही तेथे काही दिवस राहिले. लोकांच्या सेवेसाठी मंडला आणि अमरकंटक येथेही रुग्णालय सुरू करण्यात आली आहेत. लक्ष्मीनारायण मंदिर आणि राघव गुंफेत दर गुरुवारी भजन आणि सत्संग होतात. या वेळी ट्रस्टचे नारायण अग्रवाल, एड. संजीव खंडेलवाल, पुरुषोत्तम चोपकर सहित भक्तानि कार्यक्रम यशस्वीते करिता पर्यत्न केले.