पातूर – निशांत गवई
पातुरच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी रानातील भाज्याचे स्टॉल लावून विक्री केली. तसेच रानभाज्यांचे महत्व पटवून दिले.
पावसाळ्याच्या सुरुवातीला रानात उगवणाऱ्या आणि सर्वात जास्त पौस्टिक असणाऱ्या रानभाज्या दुर्मिळ होत आहेत. या भाज्यांमधून सर्वात जास्त पौष्टीक घटक आपल्याला मिळतात. या भाज्यांचे महत्व पटवून देण्यासाठी तसेच निसर्गाबद्दल आस्था निर्माण व्हावी यासाठी रानभाजी महोत्सव हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे, शाळेच्या कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम पार पडला.
यामध्ये विद्यार्थ्यांनी अनेक दुर्मिळ रणभाज्याचे स्टॉल लावून त्याचे महत्व सांगणारे पोस्टर बनवले. तसेच डिजिटल माध्यमाचा वापर करीत अनेक विद्यार्थ्यांनी पोस्टर, अनिमेटेड व्हिडीओ च्या माध्यमातून रानभाज्यांचे महत्व विषद केले. अनेक पालकांनी या महोत्सवला भेटी देऊन रानभाज्यांची खरेदी केली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मार्केटिंग चे सुद्धा धडे गिरवीण्यात आले.
या उपक्रमासाठी मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, नरेंद्र बोरकर, बजरंग भुजबटराव, अविनाश पाटील, हरिष सौंदळे, रविकिरण अवचार, पंकज अवचार, संकल्प व्यवहारे, नितु ढोणे, नयना हाडके, शानू धाडसे, प्रतीक्षा भारसाकळे, धनश्री माळी, भारती वालोकार, स्वाती वाळोकार, प्रियंका चव्हाण, पूजा खंडारे, प्रचाली थोराईत, माधुरी टाले, शीतल गुजर, ऋतुजा राऊत, रुपाली पोहरे, सुजाता पोहरे, शुभम पोहरे आदींनी परिश्रम घेतले.