Friday, November 22, 2024
Homeराज्यश्री सिद्ध नारायण टेकडी, अंबाळा (रामटेक) ला ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त...

श्री सिद्ध नारायण टेकडी, अंबाळा (रामटेक) ला ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त…

रामटेक – राजू कापसे

नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील श्री सिद्ध नारायण टेकडी, अंबाळा (रामटेक) ला ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा महाराष्ट्र सरकार कडून 24 जुलाई 24 ला प्राप्त झाला आहे. यामुळे नारायण टेकडी येथे सर्वसमावेशक सोयी सुविधांचा विकास होण्यास गती मिळणार आहे. यांचा लाभ दूर दूर वरूण येणाऱ्या श्रद्धालु भक्तांना होईल. विशेष बाब ही आहे की श्री सिद्ध नारायण टेकडी येथे वर्षातुन 3 मोठे कार्यक्रम होतात. या करिता महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगढ़ येथील हजारो श्रद्धालु भक्त येतात. तसेच वर्षभर श्रद्धालु भक्तांचं येणं जाण सुरु असत .

श्री सिद्ध नारायण टेकडी, अंबाळा येथे श्री सद्गुरु नारायण स्वामी महाराजांची संजीवन समाधी सुमारे 500 वर्षांपासून विद्यमान आहे. त्यामुळे या पवित्र स्थळाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना अंतर्गत ‘ ब ‘ वर्ग दर्जा देण्याबाबत आमदार प्रवीण दटके , जि.प. सदस्य दुधराम सवालाखे सहित आमदार अड़ आशिष जैसवाल, माजी खासदार व आमदार कृपाल तुमाने आदिनी पर्यत्न केले.

यापूर्वी नारायणी टेकडी ला क वर्ग दर्जा प्राप्त होता, दर्जा वाढ होण्याकरिता मा.मुख्यमंत्री तसेच मा. उपमुख्यमंत्री यांची वेळोवेळी भेट घेऊन त्यांना श्री सिद्ध नारायण टेकडीस ब वर्ग दर्जा द्यावा तसेच रिटेनिंग वॉल व अन्य कामांकरिता रुपये 35 कोटी देण्याची मागणी केली होती.

श्री.सिद्धनारायण टेकडीस ‘ ब ‘वर्ग दर्जा जाहीर केला त्याबद्दल श्री सद्गुरु नारायण स्वामी दरबारच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: