अमरावती – दुर्वास रोकडे
यावर्षीपासून महसूल पंधरवडा दि. 1 ते 15 ऑगस्टपर्यंत साजरा केला जात आहे. या कालावधीत शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपपक्रम राबवित आहे. त्याअनुषंगाने आज मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेंतर्गत स्वयंनोंदणी शिबिराचे आयोजन नियोजन भवन,जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा प्रशासनाचे वतीने करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांनी प्रशिक्षणार्थी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शासनाने घोषीत केलेल्या विविध महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना अशा विविध योजनांची माहिती व लाभ सर्वसामान्य जनेतेपर्यंत पोहोचविण्यासाठी महसूल पंधरवडा कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या कार्यक्रमाअंतर्गत आज स्वयंनोंदणी शिबिराचे आयोजण करण्यात आले होते.
या प्रसंगी उपस्थित होतकरु युवा प्रशिक्षणार्थी व विध्यार्थ्यांना सहाय्यक जिल्हाधिकारी अमर राऊत यांनी स्पर्धा परिक्षेबाबत मार्गदर्शन केले. तसेच कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त प्रांजल बारस्कर यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तसेच स्वयंपोर्टल वरील नोंदणीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या महसुल पंधरवडा कार्यक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रातिनिधीक स्वरुपात ३० प्रशिक्षणार्थी यांची निवड करण्यात आली व त्यातील पाच प्रशिक्षणार्थींना रुजु आदेश प्रदान करण्यात आले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हानिवडणुक अधिकारी शिवाजी शिंदे, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, ज्ञानेश्वर ध्यार, हरेश सुळ, नुतन पाटील तसेच तहसिलदार निलेश खटके, प्रशांत पडघन, भाग्यश्री देशमुख आदी उपस्थित होते.