Friday, November 22, 2024
Homeराज्यविद्यापीठात ३ ऑगस्ट रोजी रोजगार मेळाव्याचे भव्य आयोजन...

विद्यापीठात ३ ऑगस्ट रोजी रोजगार मेळाव्याचे भव्य आयोजन…

नागपूर, पुणे येथील टाटा कन्सल्टन्सी कंपनीमध्ये मिळणार नोकरी

डाटा ऑपरेटरच्या ५०० जागांसाठी भरती होणार…

अमरावती – दुर्वास रोकडे

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभाग व कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने 3 ऑगस्ट, 2024 रोजी सकाळी 10.00 वा. विद्यापीठ परिसरातील ए.व्ही. थिएटर (दृकश्राव्य सभागृह) येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये विद्याथ्र्यांच्या थेट मुलाखती घेऊन त्यांच्या पात्रतेनुसार त्यांना नागपूर, पुणे येथील टाटा कन्सल्टन्सी कंपनीच्या आस्थापनांमध्ये नोकरी मिळणार आहे. डाटा ऑपरेटर या पदाच्या 500 जागांसाठी भरती होणार आहे.

किमान पदवीधर, पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षात प्रवेशित असलेले उमेदवार यासाठी पात्र असणार आहेत. रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छूक पदवीधर उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर क्लिक करुन अर्ज सादर करावा व सदर लिंकवर आपली नोंदणी करावी. तसेच काही अडचण आल्यास –या ई-मेल आयडी वर संपर्क करावा. विद्याथ्र्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे व विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी केले आहे.

डाटा ऑपरेटरच्या 500 जागांवर भरती
देशातील अग्रगण्य मल्टी नॅशनल कंपनी म्हणून ओळख असलेल्या टी.सी.एस. कंपनीत डाटा ऑपरेटर या पदांवर या रोजगार मेळाव्यातून भरती होणार आहे. संपर्कासाठी स्वतंत्र व्यवस्था विद्याथ्र्यांना अर्ज भरतांना काही अडचण असल्यास त्यांना कार्यालयीन वेळेत जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती येथे प्रत्यक्ष वा दूरध्वनी क्र. 0721-2566066, 8605654025 किंवा 8983288982 यावर याशिवाय ई-मेल — वर संपर्क साधता येईल. अधिक माहितीसाठी विवि संचालक डॉ. राजीव बोरकर व कौविरोउ उपायुक्त द.लं. ठाकरे यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन विद्यापीठाच्यावतीने करण्यात येत आहे.

http://forms.gle/BwvrnlFZwK4MzY5H7

या लिंकवर अर्ज करता येईल.
तसेच संपर्कासाठी
[email protected]  
हा ई-मेल आहे

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: