पातुरच्या किड्स पॅराडाईज चा उपक्रम…
पातूर – निशांत गवई
वाघ वाचवा, जंगल वाचवा ही प्रतिज्ञा घेत पातुरच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. 29 जुलै 2024 रोजी जागतिक व्याघ्र दिवस जगभरात साजरा केला जातो. हा दिवस वाघांच्या संरक्षण व संवर्धन याबाबत संपुर्ण जगभर जनजागृती केली जाते.
या दिनाचे औचित्य साधून पातूर येथिल किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी वाघ वाचवा, जंगल वाचवाण्याची शपथ घेतली. विद्यार्थ्यांनी वाघाचे चेहरे बनवून आपल्या चेहऱ्यावर लावून जनजागृती केली.
यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे, शाळेच्या कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, नरेंद्र बोरकर, बजरंग भुजबटराव, अविनाश पाटील, हरिष सौंदळे, रविकिरण अवचार, पंकज अवचार, संकल्प व्यवहारे, नितु ढोणे, नयना हाडके, शानू धाडसे, प्रतीक्षा भारसाकळे, धनश्री माळी, भारती वालोकार, स्वाती वाळोकार, प्रियंका चव्हाण, पूजा खंडारे, प्रचाली थोराईत, माधुरी टाले, शीतल गुजर, ऋतुजा राऊत, रुपाली पोहरे, सुजाता पोहरे आदींनी परिश्रम घेतले.