अमरावती – दुर्वास रोकडे
जिल्हा ठिकाणातील सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विषेश मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’ लाभ घेण्यासाठी बुधवार दि.31 जुलैपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक माया केदार यांनी केले आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे त्या महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट, मागील वर्षाचे गुणपत्रिकासह आवश्यक कागदपत्र विहित मुदतीत कार्यालयात सादर करावे.