Saturday, October 19, 2024
Homeराज्यरामटेक | एचडीएफसी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी रोपे लावली...

रामटेक | एचडीएफसी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी रोपे लावली…

रामटेक – राजू कापसे

रामटेक येथील एचडीएफसी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी रामटेक येथील समर्थ कनिष्ठ महाविद्यालयात 25 रोपांची लागवड करून वृक्षारोपण केले. वृक्षारोपण मध्ये कडुनिंब, अशोका, गुलमोहर, जामुन, लिंबू या वनस्पतींचा समावेश आहे. शाखा ऑपरेशन व्यवस्थापक प्रशांत शेवळे, अधिकारी मधे रुषिकेश चिंचोळकर, अतुल पराते, अनिरुद्ध भोगे, वामन धांडे यांच्यासह विपुल मेंघरे, अल्पेश शेंडे, शुभम ठवरे, प्रतीक अंजिवार यांनी वृक्षारोपणात सहभाग घेतला. रामटेक येथील समर्थ कनिष्ठ महाविद्यालयात रोपे लावल्याबद्दल संस्थेच्या संचालक मंडळाने एचडीएफसी बँकेच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: