अमरावती – दुर्वास रोकडे
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी तहसिलदार प्रशांत पडघम तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.