जेष्ठ पत्रकार उमेश देशमुख यांचे आवाहन…
पातूर – निशांत गवई
पातूर पोस्ट ऑफिस यांच्या तर्फे डाक सामुदायिक विकास कार्यक्रम या कार्यक्रमाचे आयोजन पातूर पोस्ट ऑफिस येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष किड्स पॅराडाइस स्कुल चे संचालक गोपाल गाडगे हे होते तर उद्घाटक म्हणून पातूर येथील जेष्ठ पत्रकार उमेश देशमुख होते प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार मोहन जोशी याना आमंत्रित करण्यात आले होते तसेच या वेळी अकोला सेंट्रल चे मेल ओवरसेल साबीर भाई उपस्तीत होते.
या वेळी पातूर पोस्ट च्या योजना ह्या सर्व सामान्य जनतेसाठी आपल्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी किती महत्वाच्या आहेत याची माहिती या वेळी उपस्थित मान्यवरांनी दिली पोस्ट ऑफिस च्या विविध योजना उदा आर डी ,सेवेइंग ,लहान मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना ,महिलेसाठी महिला सम्मान योजना,तसेच जेष्ठ नागरिकांसाठी सिनियर सिटीजन ,अश्या विविध योजना ह्या नागरिकांच्या आयुष्यात किती किती महत्वाच्या आहेत याची माहिती पातूर पोस्ट ऑफिस चे पोस्ट मास्तर हरीश घुगे यांनी कार्यक्रमात उपस्थित असलेल्या नागरिकांना दिली.
या वेळी सूत्र संचालन सुरेश भोजने यांनी केले तर प्रास्ताविक चक्रधर बोडखे यांनी केले तर आभार प्रदर्शन सतीश सोनोने यांनी केले या वेळी पातूर पोस्ट ऑफिस चे कर्मचारी पोस्ट मास्तर हरीश घुगे,सुरेश भोजने,नितीन बाजड, चक्रधर बोडखे, राहुलकुमार मीना,गुलाब,गोतरकार,पोस्ट मन शिवा पजई,सतीश सोनोने,कपिल पोहरे,राजदीप लोखंडे शिरला येथील ब्रँच पोस्ट मास्टर दिनकर अंधारे,भीकजी ताले,जागृती इंगळे,जजील भाई,वैभव इंगळे,आनंद राठी,वैष्णवी गावंडे,पवार ,गणेश काळे,सस्ती येथील शेळके वैभव राठोड डाखोरे इत्यादी पातूर तालुक्यातील संपूर्ण पोस्ट ऑफिस कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.