Wednesday, October 23, 2024
Homeराज्यपातुर येथे अवैधरित्या पेट्रोल व डिझेल चा साठा करून विक्री...

पातुर येथे अवैधरित्या पेट्रोल व डिझेल चा साठा करून विक्री…

पातुर – निशांत गवई

दि. १५/०७/२०२४ रोजी गोकुल राज जी, सहाय्यक पोलीस अधिक्षक, नेमणुक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय बाळापुर अकोला यांना गुप्त बातमी दाराकडुन माहीती मिळाली की, पातुर ते वाशिम रोडवरील बोडखा परीसरातील असलेल्या नॅशनल ढाबा येथे काही लोक आपल्या अर्थिक फायदया करीता अवैधरित्या पेट्रोल व डिझेल चा साठा करून ते विक्री करीता बाळगुन आहेत.

वरून IPS गोकुल राज जी, पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळापूर यांचे मार्गदर्शनात पो.नि.किशोर शेळके सोबत पो स्टॉफ व पंचासह जावुन पंचासमक्ष रेड कारवाही केली असता. एक महिंद्रा बोलेरो पिकअप क्रंमाक MH29 AT0048 किंमत अंदाजे ३००००० / रू., सहा प्लॅस्टीकचे बॅरल २५० लीटर क्षमतेची ज्यामध्ये डिझेल पुर्ण भरलेले असे एकुण १५०० लीटर व एक प्लॅस्टीक बॅरेल ज्यामध्ये अंदाजे २० लीटर डिझेल असे एकुण १५२० लीटर किंमत १५२०००-/ रू. चे डिझेल, तीन प्लॅस्टीकचे बॅरल २५० लीटर क्षमतेची ज्यामध्ये पेट्रोल पुर्ण भरलेले असे एकुण ७५० लीटर किंमत ७८७५०-/ रू. चे पेट्रोल, द्राव्यरूपी ज्वलनशील इंधन मोजण्यासाठी एक दहा लिटरचे माप किंमत अंदाजे २०० / रू.,

एक विस लिटरचे माप किंमत अंदाजे ३०० / रू., एक प्लॅस्टीकची चाडी व जुन्या वापरत्या प्लॅस्टीकचे कॅन व एक प्लास्टीक पाईक किंमत अंदाजे २०० / रू. असा एकुण ५३१४५० / रू. चा मुद्देमाल अवैधरित्या साठवणुक व विक्री करण्याचे उददेशाने मिळुन आल्याने आरोपी नामे १) नवाज खान परवेज खान वय २३ वर्षे, रा. चांद खॉ प्लॉट वाशिम बायपास अकोला, २) मोहम्मद
फरहान मोहम्मद रज्जाक वय ३६ वर्षे, रा. रियाज कॉलनी वाशिम बायपास अकोला. यांचे हे विरूध्द पो.स्टे. पातुर येथे अप.नं. ३९५ / २०२४ कलम २८७, ३ (५) भा.न्या.सं. सहकलम
३, ७ई सी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक, बच्चन सिंह IPS अकोला यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: