भिगवण येथिल बिल्ट पेपर कंपनी मधील कंत्राटी कामगारांनी पगारवाढ व अन्य मागण्यांसाठी २० जुलै रोजी आमरण उपोषणाचा ईशारा दिला असुन कंपनी प्रशासन कंत्राटदारांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत असल्याने महाराष्ट्र कंत्राटी कामगार संघटनेने आमरण उपोषणाचा ईशारा दिल्याने बिल्ट प्रशासन कंत्राटी कामगारांच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहणार की आंदोलन चिघळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महाराष्ट्र कंत्राटी कामगार संघटनेने अनेकवेळा कंपनी प्रशासनास पगारवाढ, दिवाळी बोनस, पे हॉलिडे, ओटी, कामगारांच्या भविष्य निर्वाह निधी, ग्रॅज्युविटी कंत्राटदार भरत नाहीत यासह कंपनीकडे कायम कामगार भरती करताना आगोदर अनुभवी कंत्राटी कामगारांना संधी द्यावी त्याच प्रमाणे विनाकारण कामावरुन काढण्यात आलेल्या कंत्राटी कामगारांना कामावर घ्यावे अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष उमेश बंडगर यांनी दिली आहे.
आम्ही संघटनेच्या वतीने अनेकवेळा प्रत्यक्ष भेटुन व पत्राद्वारे मागणी करुनही आमच्या मागण्या अद्याप मान्य केल्या जात नसुन कंत्राटी कामगारांना सापत्न वागणुक दिली जात आहे मागील दोन वर्ष दिवाळी बोनस तर संघटना स्थापने पासुन पगारवाढ आणि अनेक मागण्यांचा पाठपुरावा आम्ही करत आहोत मात्र आमच्या मागण्यांना केराची टोपली दाखवली जात असल्याने कंपनी आणि कंत्राटदार हे कंत्राटी कामगारांना हिनतेची वागणुक देत असल्याची भावना कामगारांची झाली आहे. यामुळे आम्ही आंदोलनाचा पवित्रा स्विकारला आहे आमच्या पत्राची दखल कामगार आयुक्तांनी घेतली असुन आयुक्तांनी कंपनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावले आहे अशी माहिती संघटनेचे सल्लागार राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते दादासाहेब थोरात यांनी दिली.
आठ दिवसात कंपनी समोरील संघटेनेच्या बोर्ड समोर विविध स्वरुपाच्या आंदोलनाला सुरुवात करत आहोत मुख्यमत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्रजी फडणविस, पालकमंत्री अजितदादा पवार, खासदार सौ. सुप्रियाताई सुळे आमदार दत्तात्रय भरणे, आमदार रोहितदादा पवार जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक यांना निवेदन दिले असुन आठ दिवसात आमच्या मागण्या मान्य होत असतील तर आंदोलन स्थगितीचा विचार करु अन्यथा आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत. संघटना पदाधिकारी आणि कामगार यांना होणाऱ्या त्रासास कंपनी प्रशासन आणि कंत्राटदार जबाबदार राहतील असेही दादासाहेब थोरात पुढे बोलताना म्हणाले.